ऐतिहासिक महत्त्व असलेल्या करवंड 52 बुरजीकडे शासनाचे दुर्लक्ष

बुलढाणा जिल्ह्याला फार मोठं ऐतिहासिक वारसा लाभला आहे.. छत्रपती शिवराय यांचे आजोळ सिंदखेराजा हे बुलढाणा जिल्ह्यातच आहे..मात्र छत्रपती चे सासर असलेल्या पूर्वीचे बावन बुर्ज म्हणजे सध्या चे करवंड हे काळाच्या आड जाऊन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे..छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित असलेला एवढा मोठ्ठा इतिहासाचा हा वारसा सध्या सर्वानाच विसर पडल्याची शोकांतिका आहे.जवाजल्य इतिहासाला पडद्या पुढे आणून शिवकालीन या वतनाला गत वैभव मान आणि दर्जा प्राप्त करून देण्यासाठी बुलढाणा शहर आणि जिल्ह्यातील एकत्र आलेल्या इतिहास तज्ञ,नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तंजावर येथील असलेले मूळ चे करवंड वतना चे राजे हरिरुद्र प्रतापरूद्र माने इंगळे यांच्यासह करवंड बचाव समिती ची स्थापना करण्यात आली असून यातून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठव्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांच्या पत्नी या चिखली तालुक्यतील करवंड येथील इंगळे घराण्यातील होत्या.पूर्वी याला बावन बुर्ज असे म्हणत आणि या बावन बुर्ज वरून बावन गावचा राज्य चालत या वर इंगळे घराण्याचे राज्य होते.त्याच बावन बुर्ज मधील आता फकत दोन बुर्ज किल्ले उरले आहेत.जे आपल्या जुन्या भव्य इतिहासाची साक्ष देतात करवंड येथील हे इंगळे घराणे आणि इथे असलेले यांचा वाडा नामशेष झाला हे घराणे पुढे तंजावर येथे गेले आणि तिथे स्थाईक झाले. मूळची बुलढाणा जिल्ह्याच्या करवंडचे असलेले मात्र तंजावर येथे स्थाईक झालेले राजे हरी रूद्र प्रताप माने इंगळे ज्यांच्या पूर्वजांनी तंजावर आणि इतरत्र राज्य केले..त्यांचे वंशज आता आपले वतने आपली मुळे शोधत करवंडपर्यंत पोचली आहे.आपले गत वैभवाचा शोध घेवून नव्या पिढीला करवंड च्या जवाजल्या भव्य इतिहासाची नोंद घेण्यासाठी पुढे सरसावले आहे आणि मोहीम सुरू केली आहे.. आपले अस्तित्व शोधण्याची आणि त्यांना साथ दिली आहे. जिल्ह्यातील प्राध्यापक इतिहास तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि त्यातून बाहेर येतो. काळाच्या आत दडलेला शिवकालीन जुना इतिहास ..गरज आहे शासनाने लक्ष देण्याची आणि आपल्या इतिहासाला जपण्याची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *