मिनल वाठ (यावले) यांना आचार्य पदवी प्रदान, अमरावती विद्यापिठाच्या ३९ व्या दीक्षांत समारंभात पीएचडी बहाल

अमरावती, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापिठाच्या ३९ व्या दीक्षांत पदवीदान समारंभात येथील मिनल वाठ (यावले) यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा वस्पतीशास्त्र विषयांतर्गत ‘स्टडी ऑफ हेवी मेटल अँक्युम्युलेशन इन स्ट्रीट ग्रीनरी ऑफ अमरावती सिटी इन रिलेशन टू ट्री स्टेट्स’ हा त्यांच्या शोध प्रबंधाचा विषय होता.

हा शोध प्रबंध त्यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. प्रशांत गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डाँ. प्रशांत गावंडे, सं.गा.बा.अमरावती विद्यापिठ वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वर्षा नाथार, रा. तु. म. नागपूर विद्यापिठ वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डाँ. नितिन डोंगरवार, प्रा. के.सी. मोरे, डाँ. यु.एस. चौधरी, डाँ. जी.व्ही. पाटील, डाँ. एस.आर. माणिक, डाँ. जयकीरण तिडके, प्रा. डाँ. राजेंद्र हावरे, श्रीमती अलका श्रीकांत जैन आणि कुटुंबियांना दिले आहे. त्यांच्या या यशाबद्दल डाँ. अर्चना महाकाळकर, डाँ. योगीता मिरगे, डाँ. विशाल मराठे, डाँ. अंकुश कायरकर, डाँ. युगंधरा गुल्हाने, कविता गावंडे, समस्त प्राध्यापक वृंद आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *