अमरावती | अवैधरित्या गांज्या बाळगणाऱ्या आरोपीस अटक, गुन्हे शाखेच्या कारवाहीत ३.४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अमरावती अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला शहर गुन्हे शाखा पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान अवैधरित्या गांज्या बाळगणाऱ्या आरोपीस पंचवटी चौकातून अटक केली. शेख हाफिज शेख कादर राहणार मोबीनपुरा पुसद असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याचे करून ९ किलो गांज्या २ लाख ७० हजार व एक मोपेड दुचाकी किंमत अंदाजे ५० हजार व दोन मोबाईल किंमत २० हजार असा एकूण ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, यांच्या सह पथकाने ही कारवाई केली. अटकेतील आरोपीविरुद्ध एनडीपीएस ऍक्ट अन्वये कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *