अमरावतीत श्री चक्रधर स्वामी निरूपीत श्री कृष्ण कथेचे भव्य आयोजन

द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर माताखिडकी अमरावती येथे अमरावती वासनिक सेवा मंडळाचा वतीने पुरूषोत्तम मासानिमीत्य श्रीकृष्ण कथा या विषयावर निरूपण सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक ६ आँगस्ट २०२३ ते बुधवार दिनांक १६ आँगस्ट पर्यंत करण्यात आले आहे
या श्री कृष्ण कथेचे निरूपण दररोज सायंकाळी ६-३० ते ८-०० या वेळेत वडनेर भुजंग येथील देवदत्त आश्रमाचे संचालक प.पु प.म श्री दिगंबरमुनी अंकुळनेरकर बाबा महानुभाव यांचा सुमधुर वाणीतुन श्रीकृष्ण कथा या विषयावर प्रवचन आयोजीत करण्यात आले आहे. त्यांची संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी सतत प्रवचने होत असतात.

प्रवचन सोहळ्याचे उद्घाटन रविवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६-३० वाजता डाँ. अशोकराव राऊत ऊपाध्यक्ष श्रीकृष्ण मंदिर देवस्थान यांचा हस्ते करण्यात येईल. या निरूपण सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रम बुधवार दिनांक १६ आँगस्ट रोजी सकाळी १० वाजता प. पु .प. म. दर्यापुरकर बाबा महानुभाव अमरावती यांच्या ऊपस्थीतीत संपन्न होईल.

तरी या संपुर्ण कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन अमरावती वासनिक सेवा मंडळ तसेच श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *