NAGPUR | डबल मर्डरचा सूत्रधार प्रकरणात तपास सुरु

नागपुरातील डबल मर्डरचा सूत्रधारा ओंकार तलमले याने १११ बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा लावल्याची माहिती समोर आली आहे.‘नासा’मध्ये नोकरी लावून देत असल्याची थाप मारुन त्याने बेरोजगारांना गंडा लावला आहे. नागपूरात रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये नोकरी लाऊन देतो म्हणून आरोपीने बेरोजगारांची ५.३१ कोटींची फसवणुक केली आहे. या प्रकरणात फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन नागपूर पोलीसांनी तपास सुरु केला आहे. ओंकार तलमले कर्जात बुडाला होता, त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने नागपुरातील दोन व्यापाऱ्यांच्या हत्येचा कट रचला. त्याचावर मकोका अंतर्गत कारवाईचा विचार सुरु आहे, अशी माहिती नागपूर ग्रामीण पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांनी सांगितली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *