भंडारदरा धरण परिसरातील निसर्गाने सध्या कात टाकलीय

मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ एकदम फुल्ल असल्याची पाहायला मिळत आहेत. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी कडक पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.स्वातंत्र्य दिन आणि उद्या पारशी नववर्षाच्या सुट्टीचा‌ आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी केली आहे. अहमदनगर जिल्हयातील भंडारदरा धरण परिसर सध्या पर्यटकांच्या गर्दीने फुलल्याचं पाहायला मिळत आहे. धरणाच्या भिंतीजवळ गर्दी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे. पोलिस प्रशासनाने संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर उद्या सायंकाळी 8 वाजेपर्यंत एकेरी वाहतूक नियमन केल्याने पर्यटकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक पर्यटनस्थळी अशीचं परिस्थिती आहे.महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख भंडारदरा धरण परिसराची आहे. हिरवाईने नटलेला परिसर, डोंगर माथ्याहून कोसळणारे धबधबे, धरणाच्या भितींवरून ओसंडून वाहणारे पाणी बघण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे. रंधा फॉल, नेकलेस फॉल, बाहुबली फॉल, रिव्हर्स फॉल, सांदण दरी, घाटघर, कोकणकडा त्याचबरोबर राज्यातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर यासह भंडारदरा परिसरात अनेक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत. एकूणच बघितलं तर भंडारदरा धरण परिसरातील निसर्गाने सध्या कात टाकली आहे. त्यामुळे तुम्हालाही निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर लवकरच भंडारदरा धरण परिसरात जावे लागेल.मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी अधिक गर्दी झाली आहे, तिथं कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर कसल्याची प्रकारची रिस्क घेऊ नये असही पोलिस प्रशासन सांगत आहे. ज्या ठिकाणी पाणी आहे तिथं जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. सलग सुट्टी आल्यामुळे पर्यटन ठिकाणी गर्दी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *