आ. किशोर पाटील यांच्या निंदनीय कृतीचा निषेध, मूर्तीजापुरातील समस्त बांधवांतर्फे निवेदन सादर

सुमित सोनोने बातमीपत्र, मूर्तिजापूर

संताची भूमी आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख असलेल्या राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले चिंतेची आणि चिंतनीय बाब झाली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पत्रकाराला आमदार किशोर पाटील यांनी केलेली अर्वाच्य शिवीगाळ आणि मारहाण निश्चितच अशोभनीय आणि आमदारकीच्या पदाची गरिमा कमी करणारी बाब आहे.

याचा निषेध व्यक्त करीत दोषी असणाऱ्या वर तात्काळ फौजदरी स्वरूपाची कारवाई करून गुन्हे दाखल करावे व संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे होळी करीत आहोत महाराष्ट्रातील पथकारांवरील हल्ले परत वाढले आहेत पाचोरा येथील आमदाराने पत्रकारास केलेली सुविधा म्हणजे कायद्याचा कोणाला धाक राहिला नाही हेच दर्शवते याच्या निषेधार्थ का बांधवांनी सदर निवेदन देत असून याची दखल घेतली नाही तर संपूर्ण राज्यात मोठे आंदोलन खेळण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी दीपक अग्रवाल दिलीप देशमुख , प्रा.दीपक जोशी, प्रा.अविनाश बेलाडकर ,अनिल अग्रवाल विलास नसले, जयप्रकाश रावत ,ऍड. निलेश सुखसोहळे ,मोहिज शेख ,अतुल नवघरे , रवी शिंदे , सुमीत सोनोने, उद्धव कोकणे, गौरव अग्रवाल, अंकुश अग्रवाल , अथरखान , मुन्ना महाजन ,संतोष माने ,अजय प्रभे,नितीन इंगळे,मिलिंद जामनिक,धनराज सपकाळ,रोहित सोळंके निवेदनावर स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *