वलगाव निर्वाणभूमीत कर्मयोगी गाडगेबाबांच्या मुर्तीची प्रतीस्थापना

अमरावती जिल्ह्यातील कर्मयोगी संत गाडगेबाबांची निर्वाणभूमी असलेल्या,श्री गाडगे महाराज वृध्दाश्रमात सेवाव्रती बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात श्री.गाडगे बाबांच्या मुर्तीची प्रतीस्थापना तसेच वृध्दमायबापांकरीता अन्नदान व वस्त्रदानाचा सेवाभावी सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडला.
या प्रसंगी दर्यापुर येथिल कौशल्यादेवी चॅरीटेबल ट्रस्टच्या सर्वेसर्वा कौशल्यादेवी मालपाणी, रामुशेठ मालपाणी व शारदा मालपाणी यांच्या शुभहस्ते श्री गाडगेबाबांच्या मुर्तीची प्रतीस्थापना करण्यात आली.
संस्थेचे प्रमुख विश्वस्थ बापुसाहेब देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत, वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबांच्या संदेशाप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासुन पेढी नदीच्या पुण्यतीरावर वसलेल्या, श्री गाडगे महाराज वृध्दाश्रमात गोरगरीब,बेघर,वृध्दमायबापांना खर्या अर्थाने आधारदेत त्यांची निरंतर सेवा सुरु असल्याचे सांगितले. दरम्यान मुंबई येथिल दानशुर सितादेवी झुनझुनवाला व संजय झुनझुनवाला तसेच दर्यापुरचे रामुशेठ मालपाणी,बाळासाहेब खिडके,कर्करोग रुग्णसेवक प्रशांत देशमुख,व्यवस्थापक कुणाल देशमुख, गजानन जवंजाळ, यांच्या विशेष सहकार्यातुन वयोवृध्दांना वस्त्रदान व मिष्टान्न भोजन देण्यात आले. प्रामुख्याने या कार्यक्रमाला कंत्राटदार सुधीर जाधव, संचालक सागर देशमुक, व्यवस्थापक कैलास बोरसे,ह.भ.प.भरत महाराज रेळे,बाळासाहेब खिडके, माजी मुख्याध्यापक किशोर चौधरी आदिंसह परिसरातील नागरिक मोठ्या संस्खेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *