AMRAVATI | गांजाची तस्करी करणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक; एक क्विंटल आठ किलो गांजा केला जप्त

पोलिसांना माहिती मिळाली की, बडनेरा येथे एका चारचाकीने मोठ्या प्रमाणात गांज्याची तस्करी केली जाणार आहे. पोलीसांनी मोठ्या शिताफीने वाहन अडवले. वाहनात तीन जण होते आणि वाहनावर प्रेस असे लिहिले होते. पोलीसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यातून एक क्विंटल 8 किलो गांजा जप्त करण्यात आला. हा गांजा मुंबईला जाणार होता. पोलिसांनी एकूण 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी रवी मारोडकर याला अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *