भंडारा | लाखांदूरमध्ये ४ कोटी ५२ लाख रुपयाचा धान घोटाळ्याप्रकरणी संस्था सचिवास अटक

तर संस्था अध्यक्ष फरार, नऊ संचालकांना मिळाली अटकपूर्वक जमीन

विपुल परिहार, जिल्हा प्रतिनिधी, भंडारा

लाखांदूर तालुक्यातील गवराळा येथील राष्ट्रसंत सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेद्वारे करण्यात आलेल्या धान्य घोटाळ्याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी संस्था सचिव चोपराम नाकाडे यास अटक केली असून,न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. संस्थेचे अध्यक्ष सचिन मेंढे हा सध्या फरार असल्याची माहिती असून,उर्वरित नऊ संचालकांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन प्राप्त केले असल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे.

लाखांदूर तालुक्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेत राष्ट्रसंत सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेने चार कोटी 52 लाख 97 हजार 486 रुपये किमतीचा १४,८०२ सरकारी धान्याचा अफरातफर केल्याचा आरोप असून, संस्था अध्यक्ष सचिन मेंढे, सचिव चोपराम नाकाडे यांच्यासह नऊ संचालक असे 11 जणांविरोधात लाखांदूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2022 ते 2023 ह्या कालावधीत हा मोठा धान घोटाळा सदर संस्थेने करून, मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक केली आहे. लाखांदूर पोलिसांनी एकास अटक केली असली तरी, घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सचिन मेंढे अद्यापही पोलिसांना गवसला नसल्याने, न्यायालयातून अटकपूर्वक जामीनासाठी पोलिसांनी मोकळीक दिली की काय ? असा संशय व्यक्त केला जात आहे, दरम्यान संस्था सचिव चोपराम नाकाडे यास 16 ऑक्टोबर न्यायालयाने पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *