अमरावती | श्री वीर प्रताप नवदुर्गा उत्सव मंडळ सराफा येथे महाआरती, आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केली आदिशक्ती नवदुर्गेची उपासना

अमरावती नगरीत प्रसिद्ध सराफा बाजार परिसरातील श्री. वीर प्रताप नवदुर्गा उत्सव मंडळ या वर्षी आपला ५३ वा नवरात्री उत्सव साजरा करीत असून मंडळात माँ नवदुर्गेची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आपल्या भव्य दिव्या अलौकिक आयोजन व विविध देखाव्यांसाठी प्रसिद्ध या मंडळात यावर्षी सुरस-हनुमान संवाद प्रसंग व अष्टक हनुमान हा सजीव देखावा साकारण्यात आला आहे. बुधवार दिनांक १८ ऑक्टोबराला मंडळात माँ नवदुर्गेची महाआरती करण्यात आली . याप्रसंगी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी मंडळाला भेट देत आदिशक्ती माँ जगदंबेची आरती व उपासना केली. यावेळी खा . डॉ . अनिल बोन्डे , जिल्हाधिकारी सौरभ कटियार , विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, मंडळाचे संरक्षक डॉ . चंदू सोजतिया , यश खोडके आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवर अतिथींनी सुद्धा नवदुर्गेची महाआरती करून कृपाशिर्वाद घेतले. यावेळी महिलांसह भाविक भक्तांची मोठी उपस्थिती दिसून आली. अमरावतीच्या नवरात्री उत्सवात वीर प्रताप नवदुर्गा मंडळाने आपल्या भव्य आयोजनातून लौकिक मिळविला आहे. मंडळाला ५३ वर्ष झाले असून पुढेही या नवरात्री महोत्सवाला असेच भव्य स्वरूप प्राप्त होवो, अशा शब्दात आमदार महोदयांनी शुभेच्छा व्यक्त केल्यात .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *