आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांचा एल्गार; २१ ऑक्टोबर रोजी संघर्ष मेळावा

  • आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांचा राज्यव्यापी बेमुदत संप
  • आता रडायचं नाही तर फक्त लढायचच तेही पण आपल्या हक्क व न्यायासाठीच

महाराष्ट्र राज्यात शहरी व ग्रामीण भागात राष्ट्रीय आरोग्य अभियानात सद्यस्थितीत जवळपास ७० हजार आशा स्वयमसेविका कार्यरत आहेत.वर्तमान स्थितीत आशा स्वयमसेविका यांना कामावर आधारित मोबदला मिळतोय.आशा स्वयमसेविका या सार्वजनिक आरोग्य रक्षणार्थ महत्वाची जवाबदारी पार पाडत आहे. त्या आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. राज्य व केंद्र सरकारच्या आरोग्यासाठी संबंधित व सर्वसामान्य माणसाशी निगडित आरोग्य रक्षणाच्या योजना सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आशा स्वयंसेविका यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र राज्यात २००५ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात झाली. तेव्हा कमीतकमी शैक्षणिक पात्रता तसेच आदिवासी भागात निरक्षर असलेल्या व साधारणतः इयत्ता सहावी,सातवी,आठवी,नववी व दहावी उत्तीर्ण असलेल्या महिलांना आशा स्वयमसेविका पदी नियुक्ती देण्यात आली. त्यांना इंग्रजी सफाईदारपणे लिहिता व वाचता येत नाही. परंतु आरोग्य विभागाकडून आशा स्वयमसेविका यांना बहुतांश इंग्रजीत असलेल्या app ऑनलाइन पद्धतीने कामे करण्याची सक्ती केली जाते आहे.यासोबतच महाराष्ट्र राज्यामध्ये सन २००५ सालापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासून गटप्रवर्तक या अभियानात काम करीत असून सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात गटप्रवर्तक यांची संख्या जवळपास साडे तीन हजारांच्या पेक्षाही जास्त आहे. बहुतांश गटप्रवर्तक हे पदवीधर आहेत. गटप्रवर्तक यांची नेमणूक सरकार करते. त्यांना मानधन पण सरकारच देतंय. त्यांना दंड,शिक्षा करण्याचा अधिकार सरकारला आहे. म्हणजे त्यांचा मालक सरकार असून गटप्रवर्तक या शासनाच्या कर्मचारी आहेत. या तत्वानुसार एनएचएम ही आस्थापना आहे. गटप्रवर्तक यांची नेमणूक ही भारतीय संविधानानुसार आरोग्य विषयक घटनात्मक तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरिता झाली आहे. एनएचएम सारख्या तात्पुरत्या योजनेचा गटप्रवर्तक भाग नाहीत तर एनएचएम योग्य रित्या चालविण्यासाठी गटप्रवर्तकांची पदे ही कायद्याने अर्थातच ( statutory post) निर्माण केलेली पदे आहेत.सद्यस्थितीत गेल्या १८ वर्षांपासून गटप्रवर्तक हे दररोज ८ तासांपेक्षा जास्त वेळ काम करत आहे. साधारणतः २० आशा स्वयंमसेविकांसाठी एका गटप्रवर्तकांची नेमणूक करण्यात आली आहे. गटप्रवर्तक यांना त्यांच्या जॉब चार्ट नुसार वीस दिवस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात दौरे करून पाच दिवसात आशा वर्कर यांनी केलेल्या कामाचा अहवाल तयार करून वरिष्ठ स्तरावर सादर करावा लागतो. या दौरा दरम्यान गटप्रवर्तक यांना आशा वर्कर यांना भेटी देणे,त्यांना मार्गदर्शन करणे,आशा वर्कर यांच्या कामांवर देखरेख करणे इत्यादी कामे करावी लागतात.आदी बाबींवर प्रकाशझोत टाकण्यासाठी शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी अमरावती येथे दुपारी एक वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जवळ खापर्डे बगीचा ते एसटी डेपो मार्ग परिसर समिपच्या माजी नगरसेवक-दिनेशभाऊ बुब यांचा विदर्भाचा राजा गणपती विराजमान होतो, त्या मैदानात ( इर्विन हॉस्पिटल लगतचा परिसर) येथे संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटना ( सिटू) अमरावती जिल्हा च्या वतीने आशा वर्कर्स -गटप्रवर्तक यांचा राज्यव्यापी बेमुदत संप !! तसेच या संघर्ष मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सिटू महाराष्ट्र राज्य कमिटीचे महासचिव-कॉम्रेड-एम. एच. शेख हे या संघर्ष मेळाव्याचे स्थळी उदघाटक म्हणून उपस्थित राहणार आहे. तर महाराष्ट्र राज्य आशा वर्कर्स-गटप्रवर्तक फेडरेशन ( सिटू) च्या महासचिव-कॉम्रेड-पुष्पाताई पाटील या अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून सिटू महाराष्ट्र राज्य कमिटीचे कोषाध्यक्ष-कॉम्रेड -के.आर. रघु,तथा महाराष्ट्र राज्य आशा वर्कर्स -गटप्रवर्तक फेडरेशन सिटू कोषाध्यक्ष-कॉम्रेड -अर्चना घुमरे हे मार्गदर्शन करणार आहे. गटप्रवर्तक यांचे समायोजन करा,आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांच्यावरील ऑनलाइन कामाची सक्ती पूर्णपणे थांबवा,आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांच्या मानधनात केंद्र सरकारने वाढ करावी,आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांना दिवाळी बोनस देण्यात यावा,आदींसह विविध प्रकारच्या मागण्यांना घेऊन सध्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटना(सिटू)च्या वतीने राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. ही हक्काची लढाई व आंदोलन नेमके कशासाठी तसेच आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी केंद्र व राज्य सरकार का विलंब करीत आहे,याचा शासनाला जाब विचारण्यासाठी हा संघर्ष मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या संघर्ष मेळाव्याचे प्रसंगी जास्तीत जास्त संख्येने आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांनी उपस्थित राहून आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांचा आवाज बुलंद करावा. असे आवाहन या संघर्ष मेळाव्याचे निमित्ताने आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटना ( सिटू) अमरावती जिल्हा शाखेचे वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *