गायत्री दिप महायज्ञ व मंगल कलश दर्शन व पुजन, अखिल विश्व गायत्री परिवार, शाखा अमरावतीचे आयोजन

आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी केली विश्वकल्याणाची प्रार्थना

अमरावती |यज्ञ पवित्र धर्म कृत्य व परमार्थ चे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक पर्व, सण -उत्सव, पूजन, संस्कार, उपासना, साधना, आदी धार्मिक कार्यात यज्ञ महत्वाचा असून वेद मंत्रांच्या शब्द शक्तीमध्ये सामर्थ्य, समृद्धी व सुसंस्कार सामावले असल्याने शारीरिक, बौद्धिक व भावनात्मक विकासाठी तसेच आत्मकल्याण व चित्त शुद्धीसाठी यज्ञकर्म महत्वाचे मानले जाते. आजच्या नवीन पिढीमध्ये यज्ञातून संस्कार करून त्यांना जीवन कल्याणचा मार्ग दाखविण्यासाठी अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार च्या वतीने आगामी २३ ते २८ जानेवारी २०२४ मध्ये महाराष्ट्रात मुंबई येथे होऊ घातलेल्या मुंबई अश्वमेध महायज्ञ च्या पार्वभुमीवर तसेच प्रचार व प्रसाराच्या अनुषंगाने राष्ट्रीय जनजागरण मंगल कलश यात्रेचा शेगाव येथून शुभारंभ करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर अखिल विश्व गायत्री परिवार अमरावती शाखेच्या वतीने दसरा मैदान येथे दिनांक १ नोव्हेंबर २०२३ रोजी गायत्री दिप महायज्ञ एवं राष्ट्रीय जनजागरण मंगल कलश दर्शन व पूजन समारोहाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी भव्य कलश यात्रेचे दर्शन घेण्यासाठी गायत्री परिवाराच्या सिद्ध साधकांची दरम्यान या मंगल प्रसंगी अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी भेट दिली. यावेळी आमदार महोदयांनी मंगल कलश यात्रेचे दर्शन घेऊन विश्व शांती व विश्वकल्याणाची मनोकामना केली. राष्ट्रीय एकता, सर्व सजीव जाती व मानव मात्राच्या कल्याणसाठी हा दिव्य साधनेतून विश्व कल्याणाची आराधना करणायचा एक आध्यात्मिक प्रयोग असून यातून आत्मिक समाधान लाभत असल्याचे आशीर्वचन आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केले. यावेळी वेदमूर्तींनी आपल्या मार्गदर्शनात गायत्री मंत्र व यातून निष्पन्न होणारी साधना याबाबत सत्संगातून मागर्दर्शन केले. यासाठी वेद, पुराण व उपनिषदे यांचे अनेक दाखले देऊन अश्वमेध यज्ञशक्तीवर भाष्य करण्यात आले. दरम्यान संगीतमय सत्संग चांगलाच रंगात आला असता गायत्री परिवारातील साधक सुद्धा सामूहिक गायत्री मंत्र जप व वेद मंत्रोत्चार व सत्संगात तल्लीन झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *