समाज कल्याण कार्यालयावर वंचित ची धडक

  • प्रकल्प अधिकाऱ्याला तर वंचितने चक्क नोटाचा हार घालून आपला निषेध व्यक्त केला.
  • समाज कल्याण अधिकाऱ्याच्या खुर्चीला शाल व हार अर्पण केला.

यवतमाल, ( श्रीकांत खोब्रागडे ) : यवतमाळ येथील बार्टी द्वारा संचालित बँकिंग, रेल्वे, एल.आय.सी. लिपिकाच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षण वर्गात मूलभूत सुविधाचा अभाव, अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शकाचा अभाव, संगणकाची व्यवस्था नसणे व नियमित विद्यावेतन न देणे,तसेच अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनं देऊन सुद्धा नियमित तपासणी न करता कंत्राटदाराला संरक्षण देणे इत्यादी त्रुटी आणि गैरकारभाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांचे नेतृत्वात समाज कल्याण अधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयावर प्रशिक्षणार्थी व वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी धडक देऊन संबंधित यंत्रणेला जाब विचारला. तसेच सक्षम अधिकारी गैरहजर असल्यामुळे त्यांच्या अकार्यक्षमतेचा निषेध म्हणून त्यांच्या रिकाम्या खुर्चीला शाल आणि पुष्षहार अर्पण करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच देखरेख आणि सनियंत्रण करणाऱ्या प्रकल्प अधिकाऱ्याला त्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीच्या विरोधात वंचित तर्फे चक्क नोटांचा हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला. अनुसूचित जातीचे शेकडो विद्यार्थी बार्टी मार्फत बँकेच्या परीक्षेची पूर्वतयारी करीत आहेत. सदर प्रशिक्षण हे मैत्रेय करिअर अकॅडमी या खाजगी कंत्राटदाराकडे देण्यात आले असल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना संगणकासह इतर मुलभूत सुविधांचा पुरवठा न केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागली, त्यामुळे त्यांचा सहा महिन्याचा कालावधी हा व्यर्थ गेलेला आहे.प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक हानी झाली असल्यामुळे त्या निषेधार्थ डॉ निरज वाघमारे वंचित बहुजन आघाडी जिल्हा यांचे नेतृत्वात संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात येऊन आजच्या आज सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे अशी आग्रही मागणी करण्यात आली. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे, महासचिव शिवदासजी कांबळे, महिला आघाडी अध्यक्ष धम्मवतीताई वासनिक,युवा जिल्हाध्यक्ष आकाश वाणी,शहराध्यक्ष कुंदन नगराळे, महासचिव पुष्पाताई सिरसाठआणी बार्टी येथे प्रशिक्षण घेणारे रवी गोडघाटे, अमर भगत आयुष दिवे, गौरव चावरे, सिद्धांत नगराळे, आशिष बिहाडे, सुरज टिपकर प्रतीक तायडे, रविना बनसोड, आचल सहारे,क्षमा ढोके,साक्षी मिसळे, प्रणाली मुनेश्वर, नम्रता फुलमाळी, राजश्री लंबे,ओजस्विता चहांदे,, अंकिता कांबळे, भूमिका मिसळे,ऐश्वर्या दुर्योधन, अभय कळसकर,हर्षदीप बांगर, गुंजन धवणे, अर्पिता जवादे, आकाश भगत, अश्विनी साळोडे,अंकुश सालोडे, ऋषीकेष माहुरे,आदित्य कांबळे,हे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. वंचितचे धनंजयभाऊ गायकवाड,संतोषजी राऊत सर,विवेक वाघमारे,कोकाटे साहेब,प्रसेंजित भवरे,,शैलेश भानवे,विशाल पोळे,अरुण कपिले, उत्तम कांबळे, वंदना उरकुडे, सुकेशिनी खोब्रागडे, शोभना ताई कोटंबे,गोवर्धन मनवर,अशोक मनवर,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *