शिवशक्ती मंदिर अंबागेट येथे आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते साबुदाणा खिचडीचे वाटप

  • भगवान महादेवांच्या उपासनेमध्ये मनातील,आत्म्यातील अशुद्धी दूर करण्याचे सामर्थ्य आहे – आ.सौ.सुलभाताई खोडके
  • महाशिवरात्री निमित्त शिवोपासना करीत आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी भाविकाभक्तांना दिल्यात शुभेच्छा
  • महाशिवरात्री निमित्ताने भाविकभक्तांनी केला ‘ हर हर महादेव ‘ चा गजर
  • माजी नगरसेवक-रतन पहेलवान डेंडुले व मित्र परिवार च्या वतीने भव्य आयोजन

महाशिवरात्री ही एक संधी आणि शक्यता आहे, ती विशाल शून्यता अनुभवण्याची जी प्रत्येक मानवाच्या आत आहे, जी सर्व सृष्टीचा स्रोत आहे.एकीकडे शिव संहारक म्हणून ओळखला जातो. दुसरीकडे तो सर्वात कृपाळू म्हणून ओळखला जातो.उमापती महादेव हे सर्वात श्रेष्ठ दाता म्हणूनही ओळखले जातात. ‘शिव’ हा शब्द स्वच्छतेचा, पवित्रतेचा निदर्शक आहे.शिव म्हणजे शुद्धता, शिव म्हणजे संपूर्ण मांगल्य आणि शिव म्हणजे पूर्ण कल्याण. महादेवांच्या उपासनेमध्ये मनातील ,आत्म्यातील अशुद्धी दूर करण्याचे सामर्थ्य आहे. असे प्रतिपादन आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी अंबागेट परिसर समीपस्थ शिवशक्ती मंदिर येथे भविकाभक्तांना संबोधून केले. शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४ रोजी त्या शिवशक्ती मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.सर्वप्रथम आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी भगवान महादेवाचे प्रतिमेस वंदन-पूजन-माल्यार्पण करीत कृपाशीर्वाद घेतलेत. यादरम्यान त्यांनी भोलेनाथ चरणी नतमस्तक होऊन सर्व भाविकभक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी व विश्वमांगल्याची प्रार्थना केली.माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी भाविकभक्तांचे वतीने उपवासाचे व्रत केले जाते. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात.महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक आहे. अशा या महाशिवरात्रीचे पावन पर्वावर शिवशक्ती मंदिर येथे आयोजित दुग्धअभिषेक, भजनसंध्या व विविध प्रकारचे अध्यात्मिक कार्यक्रमात भाविकभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भगवान शिवशंकराचे कृपाशीर्वाद घेतले. याप्रसंगी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भाविकभक्तांना साबुदाणा खिचडी व जिलेबीचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी भाविकभक्तांचे वतीने’ हर हर महादेव’ चा एकच गजर करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक-रतन पहेलवान डेंडूले, अनिल शिरभाते, सागर शिरभाते, वैभव बीजवे, बाबू यादव,समीर पाचकवडे, सुधीर रिठे, मनीष सरवैय्या आदींसह रतन पहेलवान डेंडुले मित्र परिवार चे सदस्य, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व युवक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *