माजी आ. वीरेंद्र जगताप यांना पितृशोक

चांदूर रेल्वे,
चांदूर रेल्वेचे माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप आणि अमरावती येथील डॉ. मिलिंद जगताप यांचे वडील अण्णासाहेब उर्फ वाल्मिकराव जगताप यांचे शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता वयाच्या 90 व्या वर्षी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.

अण्णासाहेब जगताप हे वर्धा येथील गो. से. वाणिज्य महाविद्यालय येथे ते प्राध्यापक होते. तसेच नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. पुरोगामी विचारसरणी व फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीवर ते व्याख्यान देत होते. चांदूर रेल्वे येथील अतुल विद्या मंदिरच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात दोन महाविद्यालयेही स्थापन केले आहेत. अतुल विद्या मंदिर या संस्थेचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. 16 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता हिंदू स्मशानभूमी, चांदूर रेल्वे येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *