राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची आधुनिक शेती व जोडधंदे अंतर्गत पोल्ट्री फार्मला भेट

नांदगाव खंडेश्वर,
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रत्येक सहकार्य उद्योगी असावा त्यांचे नवीन क्रिएशन सातत्याने सुरु असावे असे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.सुशील गावंडे यांना मनापासून वाटतं अशी प्रतिक्रिया
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदगाव खंडेश्वर शहराध्यक्ष अथर खान यांनी सुरू केलेल्या शेती व जोडधंदे अंतर्गत आधुनिक पोल्ट्री फार्मला भेटीच्या वेळी दिली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अथर खान यांनी शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या आधुनिक पोल्ट्री फार्म या उद्योगा मध्ये सुरुवात करून चांगल्या पद्धतीने व्यवसाय उभा केला. नांदगाव खंडेश्वरला येथे शहराध्यक्षांचा पोल्ट्री फार्म आवर्जून पाहण्याकरिता गेले.त्यांनी सौर ऊर्जे युनिट च्या माध्यमातून पोल्ट्री फार्म च्या व्यवस्थापनाकरिता लागणारी विद्युत व्यवस्था उभी केली. उत्तम नियोजना मुळे पोल्ट्री फार्म चे युनिट उभे झाले. अमृता हॅचरी सोबत करार पद्धतीने त्यांचे काम सुरू आहे त्यांच्या या व्यवसायिक प्रतिष्ठानला राष्ट्रवादी युवक काँग्रेस परिवार च्या वतीने शुभेच्छा जिल्हा अध्यक्ष या नात्याने प्रा.डॉ.सुशील गावंडे यांनी दिल्या व पुढील काळात त्यांची उत्तरोत्तर प्रगती होऊ ही सदिच्छा व्यक्त केली.या वेळी ओबीसी सेलचे प्रदेश महासचिव किशोरभाऊ भेंडे, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस विपिन शिंगणे तालुका अध्यक्ष मनोज गावंडे, शहराध्यक्ष अथर खान, सोशल मीडिया जिल्हा संयोजक अजित काळबांडे, राजेश भोयर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *