वसुंधरेच्‍या रक्षणासाठी सायकल फेरी

  • महापौर, आयुक्‍तासह अधिकारी, कर्मचा-यांची सायकल चालवून जनजागृती
  • नंदकिशोर पवार व दिलीप गाढवे यांचा सत्‍कार

अमरावती प्रतिनिधी,

वसुंधरेच्‍या रक्षणासाठी अमरावती महानगरपालिकेत २ ऑक्‍टोंबर,२०२० ते ३१ मार्च,२०२१ पर्यंत माझी वसुंधरा अभियान राबविण्‍यात आले. या अभियाना अंतर्गत आठवडयातील दर बुधवार हा नो व्‍हेहीकल डे म्‍हणून पाळण्‍यात आला. मनपा परिसरात सायकल शिवाय कोणालाही प्रवेश दिल्‍या जात नव्‍हता. या अभियानाचा समारोप आज दिनांक ३१ रोजी सायकल फेरीने झाला. महापौर चेतन गावंडे, आयुक्‍त प्रशांत रोडे यांच्‍यासह पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी यांनी सायकल फेरीत सहभागी होवून प्रदुषण टाळण्‍याचा संदेश दिला. सदर जनजागृती रॅली श्‍याम चौकापासुन सुरु झाल्‍यानंतर जुना मोटर स्‍टॅंन्‍ड, बापट चौक, जयस्‍तंभ चौक, राजकमल चौक अशी मार्गक्रमण करत महानगरपालिकेच्‍या प्रांगणात आली येथे सायकल फेरीचा समारोप झाला. महानगरपालिकेचे कर्मचारी नंदकिशोर पवार व दिलीप गाढवे यांनी निरंतरपणे सायकलचा वापर करुन महानगरपालिकेत सेवा दिल्‍याबद्दल त्‍यांचा शाल, श्रीफळ, रोपटे व स्‍मृतीचिन्‍ह देवून सत्‍कार करण्‍यात आला.

आरोग्‍य व पर्यावरण संवर्धानाच्‍या दृष्‍टीकोनातून प्रत्‍येकाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला व अधिनस्‍त अधिकारी, कर्मचा-यांसह परिसरातील किमान पाच नागरिकांना याचे महत्‍व पटवून अभियानाची व्‍याप्‍ती वाढविली. लॉकडाऊनच्‍या काळात पर्यावरणामध्‍ये सकारात्‍मक बदल दिसून आला आहे. जगभरात ग्‍लोबल वॉर्मींग, हवामान बदल बाबत चिंताव्‍यक्‍त केल्‍या जात आहे. महापालिका क्षेत्रात २ ऑक्‍टोंबर, २०२१ ते ३१ मार्च, २०२१ दरम्‍यान प्रत्‍येकाच्‍या जीवनाशी निगडीत व निर्सगाशी संबंधीत माझी वसुंधरा अभियान राबविण्‍यात आले. यात पृथ्‍वी, वायु, जल, अग्‍नी आणि आकाश या पंचतत्‍वावर आधारीत शाश्‍वत निसर्गपूरक जीवनपध्‍दती अवलंबण्‍यासाठी हे अभियान सुरु करण्‍यात आले होते. सायकल चालविल्‍यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात फायदा झालेला दिसून येत आहे, तसेच सायकल चालविल्‍यामुळे शारीरिक व्‍यायाम होतो. वाहतुकीच्‍या कोंडीमध्‍ये मोठ्या प्रमाणात सवलत मिळते असे महापौर चेतन गावंडे यांनी यावेळी आपले मत व्‍यक्‍त केले.

माझी वसुंधरा अभियानात महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहु, स्‍थायी समिती सभापती शिरीष रासने, मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे, सभागृह नेता तुषार भारतीय, विरोधी पक्षनेता बबलु शेखावत, गटनेता राजेंद्र तायडे, गटनेता चेतन पवार, नगरसेवक विलास इंगोले, उपआयुक्‍त सुरेश पाटील, उपआयुक्‍त रवि पवार, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, सहाय्यक आयुक्‍त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, कार्यकारी अभियंता २ सुहास चव्‍हाण, पशुशल्‍य चिकीत्‍सक डॉ.सचिन बोंन्‍द्रे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, उद्यान अधिक्षक मुकुंद राऊत, समाज विकास अधिकारी धनंजय शिंदे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *