अमरावतीत गुन्हे शाखेकडूंन ३६ लाख ६१ हजाराचा गांजा जप्त, सापळा रचून केली कारवाई

अमरावती : अमरावती शाहरातील नागपुरी गेट पोलिस ठाणे अंतर्गत इकबालपुर परिसरात दोन चार चाकी वाहनातून शहरात गांजा विक्री साठू येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यावर सापळा रचून ३६६ किलो गांजा जप्त करण्यात आला. ज्याची किंमत ३६ लाख ६१ हजार रु वर्तवली जात आहे. यामध्ये 10 लाख रु. किंमतीच्या दोन कार सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत. अमरावतीच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सूरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *