सर्व सामान्यांना दिलासा, गॅस सिलिंडर 10 रूपयांनी स्वस्त

नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी स्वयंपाकासाठी घरगुती वापर होणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरात 10 रूपयांची कपात केली. नवे दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. सिलिंडर अल्पसा का होईना स्वस्त झाल्याने महागाईने होरपळलेल्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

नवा दर अनुदानित आणि विनाअनुदानित सिलिंडरसाठी (14.2 किलो वजनी) लागू आहे. दरकपातीमुळे दिल्लीत सिलिंडर 809 रूपयांना उपलब्ध होईल. फेब्रुवारीपासून झालेल्या चार दरवाढींमुळे सिलिंडर तब्बल 125 रूपयांनी महागला होता. आता दोन महिन्यांच्या कालावधीनंतर तो पहिल्यांदाच स्वस्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घटलेल्या किमतीचा आधार त्यासाठी घेण्यात आला आहे.

साधारणपणे सिलिंडरचा दर बदलाच्या दिवशीच जाहीर केला जातो. मात्र, यावेळी तो एक दिवस आधीच जाहीर करण्यात आला. पश्‍चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांसाठी उद्या (गुरूवार) दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्या मतदानाच्या आदल्या दिवशी सिलिंडर स्वस्त होण्याची घडामोड घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *