माणुसकीला काळिमा फासणारी एक अतिशय विकृत घटना

डॉक्टरला कुत्र्यावर बलात्कार करताना रंगेहाथ पकडले

शेजारच्या महिलेने उघडकीस आणले कृत्य
 
कोलकता,
माणुसकीला काळिमा फासणारी एक विचित्र घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकतामधील एका डॉक्टरने कुत्र्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टराविरोधात रीजेंट पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कोलकाताच्या रीजेंट पार्क भागात मंगळवारी सायंकाळी घडली. घटनेची माहिती समोर येताच परिसरातील नागरिक अचंभित झाले आहे. 

डॉक्टर एका मुक्या जनावरासोबत असे कृत्य कसे करू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच भागात राहणाऱ्या एका महिलेने १०० नंबरवर कॉल करत लालबाजार पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. आरोपी डॉक्टरचे वय ६० वर्षे आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी डॉक्टर अरविंद पार्कमध्ये बहिणीच्या घरी पत्नीसोबत राहत होता.

तक्रारदार महिलेने सांगितले की, शेजारच्या घरात राहणाऱ्या एका कुत्र्याला खायला देण्याच्या बहाण्याने आरोपी डॉक्टरने त्याला घरात नेले. थोड्या वेळाने त्या कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज येत होता. शेजारी महिलेने जाऊन पाहिले तर कुत्र्याच्या गुप्तांगातून रक्त येत होते. तेव्हा डॉक्टरच्या या घाणेरड्या कृत्याबाबत तिच्या लक्षात आले. त्यानंतर महिलेने लालबाजार पोलीस स्टेशनमध्ये लगेच फोन करत या घटनेची माहिती दिली. पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर रीजेंट पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *