ट्रक झाडावर आदळल्याने भीषण अपघात; दोनजन जागीच ठार

यवतमाळ: यवतमाळ-चंद्रपूर या राज्य महामार्ग क्रमांक चार HIghway वर ट्रकTruck झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात चालक व क्लिनर दोघेही ठार झाले आहेत. यवतमाळ-चंद्रपूर या राज्य महामार्गावरती असलेल्या खड्यांमुळे चंद्रपूरहून यवतमाळच्या दिशेने लोखंडी पोल घेऊन निघालेल्या ट्रकचा टायर फुटून अनियंत्रित ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळला आणि दोनजन जागीच ठार झाले आहेत.

आज यवतमाळ-चंद्रपूर या राज्य महामार्गावरती मोठी दुर्घटना घडली आहे यामध्ये ट्रकचालक व क्लिनर दोघेही ट्रकच्या केबिनमध्ये फसले होते आणि त्यांना सहज बाहेर काढणंही शक्य नसल्याने उपस्थित नागरिकांना काहीच करता आलं नाही तसेच या अपघाताच्या ठिकाणी लवकर कोणतीही शासकीय यंत्रणा पोहचली नसल्याने या दोघांचे प्राण गेले असा आरोप नागरिक करत आहेत.

दरम्यान हा महामार्ग वाहनधारकांसाठी महामार्ग नसून मृत्यूचा सापळा बनला आहे की काय अशी संतप्त प्रतिक्रिया ही वाहनचालकांकडून येत आहेत. तसेच या महामार्गावरती जागोजागी असलेले खड्डे आणि रस्त्यालगतची वाळलेली झाडे ही अपघातास कारणीभूत ठरत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने यावरती तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याची इच्छा सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या महामार्गावरती होणाऱ्या अपघात व मृत्यूस सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार असल्याचा आरोपही वाहनचालकांनी केला आहे.

शिवाय आज झालेल्या अपघातात ट्रक मध्ये दोनजन फसले असतानाही त्यांना वाचविण्यासाठी 5 तासात कुठलेही प्रयत्न न झाल्याने नागरिकांनPublic मधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *