नागपूर पोलिसांनी केला १०० किलो गांजा जप्त

नागपूर : नागपूर पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी दिल्लीच्या भंगारच्या दुकानांमध्ये वाहन चालकाचे काम करायचा पण लॉक डाऊन मध्ये दुकान बंद झाल्याने, तो बेरोजगार झाला. त्यामुळे तो या गांजा तस्करीकडे वळला.

काल सायंकाळी ५ च्यासुमारास नागपूर पोलिसांनी विशाखापट्टनमवरून दिल्लीला कार ने गांजा घेऊन जात असताना, चालकासहित गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. कारमध्ये १४.८९ लाखांचा गांजा या कारमधून पोलिसांनी जप्त केलेला आहे. कारमधून गांजा सोबतच फेनिरामाइन मेलेट नामक एलर्जी रोधक इंजेक्शन, ६ बोरी आणि १०० किलो गांजा तसेच अन्य सामग्री सहित २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे

आरोपी जावेद हा दिल्लीचा रहिवाशी असून, त्याच्याविरुद्ध नागपूरच्या बेलतारोडी Beltarodi पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून कारसह आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास नागपूर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *