भारतीय स्टेट बँक तर्फे पोलीस आयुक्तालयाला रेनकोट भेट

देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक ही आपल्या आपल्या उत्तम सेवेसाठी सर्वत्र परिचित आहे. या बँकचा मुख्य उद्देश हा केवळ नफा नसून सामाजिक जबाबदारी निभावणे हा आहे. त्यालाच अनुसरून दिनांक ३०/०८/२०२१ रोजी भारतीय स्टेट बँकने पोलिस खात्याला २४० रेनकोट भेट दिले. भारतीय स्टेट बँक चे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री. पंकजकुमार बरनवाल यांनी अमरावती पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंग यांना रेनकोट सोपवले.

आज सर्व बँक केवळ नफ्याकडे लक्ष देत असताना भारतीय स्टेट बँक कोरोना वॉरियर्स असणाऱ्या पोलीस खात्याच्या मदतीला धावून गेलेली दिसून येते. सध्याच्या पावसाळ्याच्या मौसमात सुद्धा महाराष्ट्र पोलिस देशाप्रती आपली भावना जपताना अखंड सेवेत स्वतःला वाहून घेत आहे. पावसाळ्यात वेळ-काळ न बघता सेवा देण्याचे व्रत जणू त्यांनी घेतलेले दिसून येते. त्यांच्या सेवेला सलाम करत भारतीय स्टेट बँक अमरावती झोनचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री.पंकजकुमार बरनवाल यांनी पोलीस खात्याला रेनकोट भेट दिले आहे. पोलिस खात्याच्या वतीने अमरावती पोलिस आयुक्त डॉ.आरती सिंग यांना हे रेनकोट प्रदान करण्यात आले. त्यावेळी पोलीस उपायुक्त (मुख्यालय) श्री.विक्रम साली सुद्धा उपस्थित होते. प्रसंगी, मीडिया सोबत बोलतांना पोलिस आयुक्तांनी भारतीय स्टेट बँकने केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांचे आभार मानले आणि महाराष्ट्र पोलिस व भारतीय स्टेट बँकेचे संबंध असेच वृद्धिंगत होवो अशी अपेक्षा व्यक्त केली.

नंतर श्री. पंकजकुमार बरनवाल यांनी पोलिस दलाच्या कार्याला वंदन करतांना या उपक्रमामागील आपली भूमिका कथन केली. त्यांनी उपस्थित मीडिया सोबत बोलतांना असेल सांगितले की, “आम्ही आपली जबाबदारी ओळखून अश्या प्रकारचे सामाजिक कार्य नेहमी करत आलेलो आहे. मागील महिन्यात आम्ही अमरावती महानगरपालिकेला ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट दिले. आज आम्ही पोलिस खात्याला रेनकोट देत आहोत. पुढे पण आम्ही अश्या प्रकारचे कार्य करत राहू. प्रसंगी पोलिस खात्याचे आभार आम्ही व्यक्त करतो जे अहोरात्र आपल्या सेवेसाठी तत्पर असतात.” यावेळी भारतीय स्टेट बँक तर्फे अमरावती झोनचे आसिस्टंट जनरल मॅनेजर (डिजिटल) श्री. उमेश डाखे,अमरावती कॅम्प शाखेचे चिफ मॅनेजर श्री.निलेश सराड, डेप्युटी जनरल मॅनेजर यांचे स्वीय सचिव श्री.अमोल राऊत, डेप्युटी मॅनेजर श्री.ब्रिजेश सिंगलवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *