मंदिर उघडण्यासाठी भा.ज.पा.अध्यात्मिक आघाडी वतीने शंखनाद आंदोलन

भा.ज.पा. शहर जिल्ह्याच्या वतीने शहर जिल्हा अध्यक्ष किरण भाऊ पातुरकर , आमदार प्रविण भाऊ पोटे, निलेश अ.काजे संयोजक अध्यात्मिक आघाडी, मीनाताई पाठक अध्यात्मिक आघाडी समन्वय यांच्या नेतृत्वात ,अमरावती शहरवासियांचे अाद्य कुलदैवत शहरस्वामिनी अंबा देवीचा मंदिरा समोर शंखनाद करुन आंदोलन करण्यात आले.

मंदिरे ही जनतेचा अास्था अाणी मानसिक अाधाराची केंद्र असतात. कोविड संकटाचा वेळी समाजबांधवांना मनस्वास्थ टिकवण्यासाठी मंदिर हा एकमेव अाधार वाटतो अशावेळी केवळ मंदिरात लोकांची गर्दी होईल असा काल्पनीक तर्क लढवुन जनतेचा भावनांचा उपमर्द करण्याचे कृत्य हे महाअाघाडी सरकार करत अाहे.

बार चालु अाहेत,दारुचा दुकांनाचा रांगा चालतात,पण फक्त मनाला अाधार देणारी मंदिरे बंद अाहेत. मंदिरांचा भक्तांचा पर्याटनांवर बंदी पण बाकी सर्व पर्यटन क्षेत्र ,तेथिल हाॅटेल सुरु अाहेत.कारण अार्थीक ऊलाढाल महत्वाची वाटते,पण मंदिरांवर अवलंबुन असलेले,फुल वाले, ओटीवाले, फोटोवाले,धार्मिक पर्याटनावर अवलंबुन असलेले हजारो दुकानदार व त्यांचा कुटुंबांचा उपजिवीकेचा विचार करायला हे सरकार तयार नाही.
या बहिर्‍या सरकारला जाग अाणण्यासाठी भा.ज.पा.अध्यात्मिक आघाडीने अाज शंख नाद अांदोलन केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम ताई शाहू, प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, प्रदेश सदस्य प्रा.रवींद्र खांडेकर, महामंत्री गजानन देशमुख, मनपा सभापती सचिन रासने, महिला अध्यक्ष लताताई देशमुख व भाजपा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *