जिल्हा बँक निवडणुकीचा बिगूल वाजला आजपासून नामांकन, ४ ऑक्टोबरला मतदान

अमरावती, 
दि. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. २१ संचालक पदाच्या निवडीसाठी ३१ ऑगस्टपासून नामांकन प्रक्रिया प्रारंभ होत असल्याचा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी जारी केला. जिल्हा बँकेची निवडणूक तब्बल ११ वर्षांनी होऊ घातली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राशी निगडीत नेते, राजकीय पुढारी, सेवा सहकारी सोसायटी संस्थाशी जवळीक असलेल्यांनी मोर्चेबांधणीला अगोदरच सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून निवडणुकीची प्रतीक्षा असताना आता अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्याने अनेक इच्छुकांची गर्दी वाढणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन पॅनल मैदानात असतील. सहकारी नागरी बँक मतदारसंघ १, वैयक्तिक मतदारसंघ १, सेवा सहकारी सोसायटी १४, महिला २, ओबीसी १, अनुसूचित जाती १, व्हीजेएनटी प्रवर्ग १ असे २१ उमेदवार निवडून येतील.
 

तालुकानिहाय मतदार
अमरावती तालुक्यात ४३, धामणगाव ३३, अचलपूर ५०, धारणी २, चिखलदरा १६, वरुड ६०, भातकुली ४०, नांदगाव ३९, दर्यापूर ७५, चांदूर रेल्वे ३०, तिवसा ३६, चांदूर बाजार ४१, मोर्शी ६७ अंजनगाव सु. ५६ मतदार आहे. वैयक्तिक मतदार संघ क (१) ५८१, सह. ना. बँक मतदार संघ क (२) ५०१, १४ सेवा सहकारी सोसायटी ६०४ अशी मतदार संख्या असेल.
 
निवडणूक कार्यक्रम
नामांकन दाखल करणे ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर (दुपारी ११ ते ३, प्राप्त नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर, नामनिर्देशन पत्राची छाननी ७ सप्टेंबर, विधिग्राह्य नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध करणे ८ सप्टेंबर, उमेदवारांचे नामनिर्देशन मागे घेणे ८ ते २२ सप्टेंबर, उमेदवारांना बोधचिन्ह वाटप करणे व अंतिम यादी २३ सप्टेंबर, मतदान ४ ऑक्टोबर (सकाळी ८ ते ५ वाजता, मतमोजणी ५ ऑक्टोबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *