नाल्यात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू

उमरखेड,  
तालुक्यातील टाकळी येथे आपल्या शेतात असलेल्या जनावरांना चारा टाकण्यासाठी जात असताना शेताच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये पाय घसरल्याने शेतकर्‍याचा मृत्यू झाला असल्याची घटना बुधवार, 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान टाकळी शेत शिवारात घडली. जानबा लक्ष्मण सोनटक्के (वय 65) असे शेतकर्‍याचे नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने नाल्यांना पूर आलेला असताना शेतात जनावरे उपाशी आहेत.
  

त्यांना चारा टाकण्याच्या हेतूने शेतात जात असताना शेतालगत असलेल्या नाल्यांमध्ये पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना उघडकीस आली. या घटनेमुळे अगोदरच शेतकर्‍यावर अस्मानी संकट आलेले असताना निसर्गाच्या अवकृपेने आज एका शेतकर्‍यावर मृत्यू ओढवला. या घटनेमुळे टाकळीत शिवारात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *