शहानूर नदीत कोसळली कार

दर्यापूर ते दहिहांडा मार्गावर येत असलेल्या भामोद गावच्या थांब्यापासुन अर्धा किलोमीटर अंतरावर एका वळणा पासून वाहत असलेल्या शहानुर नदीपात्रातच्या पाण्यात एक चार चाकी वाहन पडून असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्याची माहिती येवदा पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमवारी व मंगळवारी जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे नदी व नाल्यांना पुराचे स्वरूप आले होते. शहानुर नदीचे पाणी आज रोजी कमी झाल्यामुळे चार चाकी वाहनाचे दोन चाक पाण्यावर दिसू लागले. चार चाकी वाहन दहीहंडा कडून दर्यापूर कडे जात होते. वळणावरून हे वाहन नदीत कोसळले असता नदीकाठचे बंगाली चे झाडे तुटल्या अवस्थेत दिसत आहे. व हे वाहन कुण्या दिशेने येऊन कोणत्या दिशेने जात होते याचे पुरावे देत आहे.तर वाहनाच्या काही काचाची तुकडे या ठिकाणी दिसून येत आहे. ही घटना दोन दिवस आधी घडल्याचे येथील नागरिकांकडून बोलल्या जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *