नागपुरात कोरोना झालेल्या रुग्णांवर होणार नाकाद्वारे उपचार

नागपूर – कोरोना विषाणूचा सर्वाधिक फैलावाचा धोका नाकाद्वारे असतो. त्यामुळे आता कोरोनावर नाकाद्वारे उपचार पद्धती विकसीत होत आहे. या पद्धतीच्या मानवी चाचणीला नागपूरच्या मेडिकल या शासकीय रुग्णालयात परवानगी मिळाली आहे. ही पद्धत कोरोनाचे इन्फेक्शन\ रोखण्यासाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.

स्प्रे स्वरूपात हे कोरोनावरील औषध असून देशात वेगवेगळ्या ठिकाणी या औषधाची तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देखील याची ट्रायल घेतल्या जात आहे. थोडक्यात कोविड झाल्या नंतर ही एकप्रकारे कोविडची उपचार पद्धती आहे.रुग्ण पॉझिटिव्ह आल्याच्या 48 तासाच्या आत सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णावर दिवसातून हा नेझल स्प्रे सहा वेळा मारला जातो.

पाच दिवस ठराविक अंतरावर हा स्प्रे मारायचा आहे. सध्या सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांवर याचे ट्रायल घेण्यात येत आहे. त्यानंतर आठव्या दिवशी त्याची RTPCR चाचणी घेण्यात येणार असून 28 दिवस त्या रुग्णाला अंडर ओबाझर्वेशन ठेवण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्याच्या या ट्रायल मध्ये देशभरातून 306 रुग्णांवर ही ट्रायल घेतली जात आहे. पहिल्या दोन टप्प्यातील ट्रायलचा निकाल सकारात्मक आल्याने डॉक्टरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे औषधी शास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेश गोसावी यांच्या नेतृत्वात ही ट्रायल सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *