संशयित दहशतवाद्याला अटक; ATS ची मोठी कारवाई

मुंबई,
महाराष्ट्र एटीएसने एक मोठी कारवाई करत संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. या संशयित दहशतवाद्याला मुंबईतील वांद्रे परिसरातून अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात दहशतवाद्यांशी संबंधित मुंबईतील ही तिसरी अटक आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याचे नाव मोहम्मद इरफान रेहमत अली शेख असे असल्याची माहिती समोर आली आहे.
 
यापूर्वी अटक करण्यात आलेल्या झाकीर या दहशतवाद्याच्या चौकशी नंतर एटीएसने मोहम्मद इरफान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्याला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईत राहणारा होता. त्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक केली.
 
वांद्रे परिसरातून आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने विविध ठिकाणांहून सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई केली. 18 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव झाकीर आहे. झाकीरचे आणि दिल्ली पोलिसांनी अटक केल्या सहा दहशतवाद्यांचे एकमेकांसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसारच महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांनी झाकीरला अटक केली होती. अटक करण्यात आलेला दहशतवादी जान मोहम्मद याने झाकीरला मुंबईत स्फोटके आणि इतर शस्त्रे आणण्यास सांगितले होते, अशी माहिती एटीएसने दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *