AMRAVATI | घरात राहून थर्टीफर्स्ट साजरा करण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

यंदाचा थर्टीफर्स्ट ओमायक्रॉनच्या दहशतीत आज अमरावतीत राहणार १५०० पोलिसांचा बंदोबस्त

नवीन वर्षाच्या स्वागता दरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच कोरोना व ओमायक्रॉनमुळे अमरावती शहर पोलिसांनी आज ३१ डिसेंबरच्या रात्री शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्याबाबत नियोजन केले आहे. पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्या मार्गदर्शनात शहरात  रात्री १५००पोलिस कर्मचारी  अधिकारी, अंमलदार तैनात असणार आहे, त्यामुळे घरी राहूनच यंदाचा थर्टी फस्ट साजरा करा असं पोलिसांनी आवाहन केले आहे,आज रात्री शहरातील मुख्य चौक आणि महत्त्वाच्या मार्गावर बॅरिकेड्स लावून नाकाबंदी मोहीम राबवण्यात येणार आहे. त्या ठिकाणी ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह मोहीम राबवून ब्रिथ अॅनालायझरद्वारे वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे. जे वाहनचालक मद्य पिऊन आहेत, त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *