धक्कादायक! ‘मुलांचा सांभाळ कर’ म्हणत जवानाच्या पत्नीची आत्महत्या; मन सुन्न करणारं कारण समोर

नागपूर : ‘आई, तू माझ्या मुलांचा सांभाळ कर’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवानाच्या पत्नीने आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना बुधवारी ३ वाजताच्या सुमारास शिवणगावमधील सीआरपीएफ कॅम्प येथे घडली. पूनम राजकुमार डगवार (वय ३१), असे मृतकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार हे झारखंडमधील रांची येथे तैनात आहेत. पूनम या दोन मुलांसह सीआरपीएफ कॅम्पमध्ये राहायची. २७ डिसेंबरला राजकुमार हे घरी आले. यावेळी त्यांचा पूनम यांच्यासोबत वाद झाला. राजकुमार रांचीला परतले. मंगळवारी दुपारी पूनम यांनी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *