युक्रेनमध्ये अडकलेले 219 भारतीय प्रवासी मुंबईत दाखल; विशेष विमान पोहचले

मुंबई – युक्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांपैकी 219 प्रवासी मुंबई विमातळावर दाखल झाले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही मुंबई विमानतळावर पोहोचल्या आहेत. विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पालकही विमानतळावर दाखल झाले आहेत. पाच दिवसांपूर्वीच मुंबईतील काही विद्यार्थी युक्रेनला गेले होते. साधारणपणे 8 ते 8:30 पर्यंत विद्यार्थी मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत.

युद्धग्रस्त युक्रेनमधून विमानाद्वारे येत असलेल्या भारतीयांसाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष कॉरिडॉर स्थापन करण्यात आला आहे. युक्रेनमधून येणाऱ्या भारतीयांकडे कोविड लसीकरण प्रमाणपत्र अथवा आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली. दरम्यान, या विमानाने रोमानियातून उड्डाण केले होते.

एअर इंडियाचे Boeing 787 चे AI-1943 क्रमांकच्या विमानाने आज पहाटे मुंबईहून ३ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण केले होते. हे विमान रोमानियाच्या बुखारेस्टमध्ये सुरक्षितपणे उतरले. यानंतर भारतीय नागरिकांना घेऊन या विमानाने मुंबईसाठी उड्डाण केले होते. या विमानात २१९ भारतीय होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *