विजेची मागणी 28000 MVपर्यंत! राज्याला लोडशेडिंगपासून वाचवणार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचं आश्वासन!

मुंबई | राज्यातील वीजेची मागणी सध्या 28 हजार मेगावॅटपर्यंत पोहोचली असून दीड ते अडीच हजार मेगावॅट वीज आम्ही बाहेरून विकत घेत आहोत. सुदैवाने सर्व वीजनिर्मिती प्रकल्प सुरु आहेत. सर्व ठिकाणाहून निर्मिती सुरु आहे. कोळशाची टंचाई लक्षात घेता, आम्ही सर्व कंपन्यांशी संवाद साधत आहोत. कोणत्याही परिस्थितीत राज्याला लोडशेडिंगच्या संकटापासून वाचवण्याचे आम्ही प्रयत्न करू, असं आश्वासन नितीन राऊत यांनी दिलं आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ऊर्जा मंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रावर सध्या कोशळाच्या टंचाईचं संकट आहे. त्यातच महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपकरी संघटांशीही आम्ही संपर्कात आहोत. लवकरच या प्रश्नी तोडगा निघेल, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली.

राज्यात दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक असून आम्ही कोळसा निर्मिती कंपन्यांच्या संपर्कात आहोत, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. मंगळवारी दुपारी त्यांनी राज्यातील वीजेची गरज आणि वीज निर्मिती प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर नितीन राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ वीजेची मागणी 28 हजार मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. हा दुपारी 12 वाजताचा रिअल टाइ डाटा आहे. दीड हजार ते अडीच हजार मेगावॅट वीज आम्ही बाहेरून विकत घेतो. सुदैवाने आमचे जनरेशनचे सर्व प्लांट सुरु आहेत. सर्व ठिकाणाहून वीज निर्मिती सुरु आहे. कोळशाची टंचाई लक्षात घेता सर्व कंपन्यांशी संवाद साधत आहोत. डब्ल्यूसीएलसोबत चर्चा सुरु आहे. तसेच अधिकाऱ्यांनी सर्वांशी संवाद साधून नियोजन केलं आहे. सर्व प्लांट सुरु ठेवले आहेत. हायड्रोचाही प्लांट, गॅसचा प्लांट सुरु आहे.

राज्यात कोणत्याही स्थितीत लोडशेडिंगचं संकट येणार नाही, असे प्रयत्न सुरु असल्याचं नितीन राऊत म्हणाले. तसेच कोणत्याही स्थितीत, अगदी विपरित स्थिती निर्माण झाली तरी वीजपुरवठा थांबवणार नाही. राज्याला अंधारात लोटला जाणार नाही, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांचे कर्मचारी सध्या संपावर आहेत. याविषयी बोलताना नितीन राऊत म्हणाले, ‘ कालपासून कर्मचारी संपावर गेले. चर्चेच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात. काल मी संघटनांना संप मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी कोणताही तोडगा काढण्यास सकारात्मकता दर्शनली नाही. त्यामुळे मी आज दुपारची बैठक रद्द केली आहे. सर्व युनियनच्या लोकांनी संपर्क केला. मी बैठक घेणार नाही. परंतु संपकऱ्यांना भेटायचं असेल तर मी संवादाची दारं उघडी ठेवली आहेत. सदैव उघडी ठेवली जातील. राज्यात कुठेही वीजेचा तुटवडा होऊ देणार नाही. प्रधान सचिव खात्याचे कंट्रोल रुममधून सर्वत्र नजर ठेवून आहेत. युद्ध पातळीवर काम करत आहोत, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली.

दरम्यान, संप सुरु असतानाही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचे नितीन राऊत यांनी आभार मानले. ते म्हणाले, ‘ वीज कर्मचारी सैनिकांना धन्यवाद. हरताळ सुरु असतानाही कामावर राहून राज्याला लोडशेडिंगमध्ये जाऊ दिलं नाही. त्यांना मी सलाम करतो. त्यांच्यामुळेच आज एक चांगली परिस्थिती आहे. लॉकडाऊनमध्येही त्यांनी चांगली कामगिरी पार पडली. मी पुन्हा एकदा वीज कर्मचारी संघटनांना निवेदन राहणार आहे. सलोखा आणि संधीचा फायदा घ्यावा. महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही संवाद साधण्यासाठी तयार आहोत. ऊर्जा खात्याचा मंत्री या नात्यानं संघटनांचा प्रमुख आहे. विनंत करतो की, संपकऱ्यांनी संवादासाठी पुढे यावं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *