शरद पवारांचा असाही साधेपणा, विमान प्रवासातला PHOTO VIRAL

मुंबई, 29 मार्च : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वयाच्या 81 व्या वर्षी सुद्धा राज्यभरात पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे दौरे करत असतात. अगदी ठरल्यावेळी शरद पवार बिनचूक दौरा करत असतात. आज मुंबई विमानतळावर शरद पवारांचा साधेपणा पाहण्यास मिळाला. व्हीआयपी रांग सोडून त्यांनी सर्वसामान्य प्रवाशांसोबत विमानात प्रवेश केला. त्यांचा हा फोटो व्हायरल झाला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीच्या दौऱ्यावर निघाले होते. दिल्लीला जाण्यासाठी ते मुंबई विमानतळावर पोहोचले होते. नेहमी व्हीआयपी व्यक्तींना विमान प्रवासात वेगळ्या रांगेतून प्रवेश दिला जात असतो. मागील जागेवरील सर्व प्रवाशी आत गेल्यानंतर व्हीआयपी व्यक्तींना प्रवेश दिला जातो.

पण, शरद पवार यांनी सर्वसामान्य प्रवाशांसोबत विमानात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी रांगेत उभं राहून विमानात प्रवेश केला. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष आपल्यासोबत रांगेत उभे असलेल्याचे पाहून प्रवाशीही अवाक् झाले होते. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय तपास यंत्रणाकडून होत असलेल्या तपासाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत मोदी सरकारवर घणाघाती प्रहार केला आहे. ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांच्यासह सर्व विरोधकांना पत्र लिहिले आहे. नवी दिल्लीत लवकरच सर्व मोदी सरकार विरोधी पक्षांची बैठक होणार असल्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *