भव्य रात्रकालीन कास्को बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, आ.सुलभाताई खोडके यांच्या हस्ते आज उदघाटन

अमरावती : स्थानिक श्रमसाफल्य अभियंता क्रीडांगण विकास समिती व श्री क्रिकेट अकादमी द्वारा भव्य रात्रकालीन कास्को बॉल क्रिकेट स्पर्धा २०२२चे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता व्हिएमव्ही रोड स्थित श्रमसाफल्य अभियंता क्रीडांगण येथे आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत डवरे, क्रीडा उपसंचालक अमरावती श्री. विजय संतान, महिला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संगीताताई ठाकरे, समाजसेविका छायाताई संजीव कथीलकर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष किर्तीमालाताई चौधरी, निलेश ठाकरे, एपीएमसीचे सचिव दीपक विजयकर, श्रीकृष्णजी टोंगसे, दीपक सम्राट, प्रताप देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. स्पर्धेचे उदघाटन होताच रात्रकालीन क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात होईल. या उदघाटन कार्यक्रमाला क्रीडा प्रेमी व खेळाडूंनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *