हर्षल गायकवाड अमरावती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, रामटेक नगर पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून सांभाळला आहे पदभार

अमरावती महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून हर्षल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आता अमरावती मनपाचे दुसरे अतिरिक्त आयुक्त असणार आहेत. यापूर्वी सोमनाथ शेटे १५ जून २०१६ ला पहिले अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झाले होते. त्यांनी केवळ दीड वर्षच कामकाज सांभाळले. त्यानंतर ७ वर्ष हे पद रिक्त होते. आता हर्षल गायकवाड म्हणून मनपाला अतिरिक्त आयुक्त मिळाले आहे. हर्षल गायकवाड यांनी यापूर्वी लातूर महानगर पालिकेत उपायुक्त नंतर यवतमाळ येथे जिल्हा प्रशासक अधिकारी म्हणून कामकाज केले. दरम्यान रामटेक नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असतांना आता त्यांना अमरावतीचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *