अमरावती | मोदी सरकार विरुद्ध काँग्रेसचे महागाई जुमला आंदोलन, पेट्रोलपंपावर भोंगे लावून आंदोलन

वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या कीमती लक्ष्यात घेता अमरावती शहर जिल्ह्या काँग्रेसने पेट्रोलपंप जवळ भोंगे लावत केंद्र सरकार चां निषेध केला.निवडणूक काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना इंधन दरवाढीवरून लोकांना आश्वस्त केले होते.. मात्र आश्वासन केवळ हवेत राहिल्याने काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. मोदींची ऑडिओ क्लिप भोंग्यातून वाजवत केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. अमरावतीत इरविन चौकातील पेट्रोल पंपावर काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी नरेंद्र मोदींवर टीका देखील कटण्यात आली. नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप देखील काँग्रेसने केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *