आमदार सुलभाताई खोडके यांनी घेतला शिक्षण विभागाचा आढावा, महापालिकेच्‍या शाळांमध्‍ये मिळणार इंग्रजी माध्‍यमांचे अद्ययावत शिक्षण

आगामी सत्रापासून नियोजन करण्‍याची शिक्षण विभागाला सुचना

अमरावती दि.३० एप्रिल : महापालिकेच्‍या वतीने संचलीत शाळांमध्‍ये आर्थिक दुर्बल घटक गरीब, गरजु तसेच सर्व सामान्‍य परिवारातील मुले शिक्षण घेतात. आजच्‍या अद्ययावत युगामध्‍ये विद्यार्थ्‍यांना प्रगत व नाविण्‍यपुर्ण शिक्षण मिळालेच पाहिजे यासाठी महापालिकेच्‍या शाळांच्‍या शैक्षणिक दर्जा सुधारणे गरजेचे असून सर्व शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचा-यांनी सुध्‍दा सामाजिक बांधीलकेतून हे काम करणे गरजेचे आहे. त्‍यामुळे आगामी जुन महिन्‍यापासून सुरु होणा-या नव्‍या शैक्षणिक सत्राचे नियोजन हे आतापासूनच करुन मनपा शाळांच्‍या शैक्षणिक दर्जा सुधारणाबाबतची सुचना आमदार सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी केले.

शनिवार दिनांक ३० एप्रिल,२०२२ रोजी मनपाच्‍या स्‍व.सुदामकाका देशमुख सभागृहामध्‍ये आयोजित महापालिका शिक्षण विभागाच्‍या बैठकीत विविध मुद्यांवर आढावा घेतांना त्‍या बोलत होत्‍या. मा. आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी या बैठकीत महापालिका शाळांअंतर्गत शैक्षणिक सोईसुविधा, समग्र शिक्षण, क्रीडा विभाग, गणवेश सुविधा यासह सर्व शाळामधील पायाभूत व सुविधा विषयीच्‍या सविस्‍तर आढावा घेण्‍यात आला. सर्वप्रथम मनपाचे शिक्षणाधिकारी डॉ.अब्‍दुल राजीक यांनी महापालिकेच्‍या एकुण प्राथमिक व माध्‍यमिक च्‍या मराठी, हिंदी, उर्दु माध्‍यमांच्‍या शाळा विषयी माहिती दिली.

ज्‍यामध्‍ये एकुण ६४ शाळांपैकी ५८ शाळा प्राथमिक व ६ माध्‍यमिक शाळा असून प्राथमिकच्‍या ३२ शाळा मराठी माध्‍य‍माच्‍या १० शाळा हिंदी माध्‍यमाच्‍या सर्व १६ शाळा उर्दु माध्‍यमाच्‍या असल्‍याचे सांगण्‍यात आले. तसेच माध्‍यमिक शाळांमध्‍ये तीन शाळा मराठी माध्‍यमांच्‍या व हिंदी व उर्दु माध्‍यमांच्‍या अनुक्रमे दोन व एक शाळा असल्‍याचे सांगण्‍यात आले. एकुण विद्यार्थी ९३६१ महापालिकेच्‍या शाळेत शिकत असल्‍याचे समोर आले. यावर आमदार महोदयांनी कमी पटसंख्‍येच्‍या शाळांबाबत माहिती जाणून घेतली. शाळांची पटसंख्‍या कमी होण्‍यासाठी आपले शिक्षक जबाबदार आहेत. जिथे शिक्षक चांगले काम करतात तेथे पटसंख्‍या वाढते. जिथे अपेक्षित काम होत नाही तेथे विद्यार्थ्‍यांची पटसंख्‍या वाढत नसल्‍याचे नाराजी आमदार महोदयांनी व्‍यक्‍त केली. यावर शिक्षणाधिकारी डॉ.अब्‍दुल राजीक यांनी सांगितले की, पालकांच्‍या इंग्रजी माध्‍यमांकडे कल वाढल्‍याने मनपा शाळांतील पटसंख्‍या कमी झाल्‍याचे हेही एक कारण आहे. यावर आमदार महोदयांनी सकारात्‍मक प्रतिसाद दिला व मनपा शाळांचा दर्जा सुधारण्‍यासाठी शहराच्‍या वेगवेगळ्या भागात एक-एक इंग्रजी माध्‍यम शाळा सुरु करण्‍यासाठी प्रस्‍तावीत करावे अशी सुचना केली. महापालिकेच्‍या अनेक सेमी इंग्लिश शाळा या पाचवी नंतर आहे. त्‍यामुळे इंग्रजी माध्‍यमांचे शिक्षण हे प्राथमिक पासूनच सुरु करावे यासाठी महापालिकेने बालवाड्या सुध्‍दा सुरु कराव्‍या जेणेकरुन मनपाची पटसंख्‍या वाढीस लागण्‍यास मदत होईल असे सुध्‍दा आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी सुचीत केले. अनेक शहरांमध्‍ये महापालिकेच्‍या शाळा डिजीटल व अद्ययावत झालेल्‍या आहेत. या धर्तीवर अमरावती महानगरपालिकेच्‍या शाळेमध्‍ये सुध्‍दा बोलक्‍या भिंतीत, स्‍मार्ड रुम, डिजीटल बोर्ड, संगणक कक्ष, ग्रंथालय, खेळणी साहित्‍य तसेच सीसीटीव्‍ही कॅमेरे आदींची व्‍यवस्‍था होणे आवश्‍यक आहे यासाठी महापालिकेने प्रस्‍ताव तयार करावा. येत्‍या जुन पासून प्रायोगिक तत्‍वावर याची अंमलबजावणी व्‍हावी अश्‍या सुचना सुध्‍दा आमदार महोदयांनी केल्‍या. मनपाच्‍या भाड्याच्‍या इमारतीमध्‍ये सुरु असलेल्‍या शाळा नालसाहबपुरा शाळा क्र.४, लालखडी शाळा क्र.१२ तसेच रजा नगर बडनेरा येथील शाळा भाड्याच्‍या इमारती ऐवजी मनपाच्‍या नविन इमारती बांधण्‍याचे सुध्‍दा बैठकीत प्रस्‍तावित करण्‍यात आले. यासाठी मनपा फंडातून, सीएसआर फंडातून प्रयोजन करण्‍यात येईल अशी माहिती सुध्‍दा या बैठकीत देण्‍यात आली.

विद्यार्थ्‍यांच्‍या शैक्षणिक विकासाबरोबरच त्‍यांचा क्रीडा विकास होणे सुध्‍दा आवश्‍यक आहे. त्‍यामुळे प्रत्‍येक शाळेत आधुनिक व दर्जेदार खेळणी साहित्‍य देण्‍याचे नियोजन करावे तसेच शाळेत कवायती, योगा व अॅरोबीक्‍स चे धडे देण्‍यासाठी क्रीडा शिक्षक असायला पाहिजे व याची अंमलबजावणी येत्‍या सत्रापासूनच करावी अशी सुध्‍दा आमदार महोदय यांच्‍या वतीने देण्‍यात आली. तसेच ज्‍या माध्‍यमिक शाळांमध्‍ये चांगली पटसंख्‍या आहे त्‍या शाळांमध्‍ये उच्‍च माध्‍यमिक वर्ग सुरु करण्‍याचा प्रस्‍ताव तयार करावा. ज्‍या उच्‍च प्राथमिक शाळांमध्‍ये पटसंख्‍या चांगली आहे तेथे इयत्‍ता ९ वी व १० वी वर्ग सुरु करण्‍याचा प्रस्‍ताव तयार करावा अश्‍या सुचना सुध्‍दा आमदार महोदयांनी व्‍यक्‍त केली. एकंदरीत सद्यास्थितीत सुरु असलेल्‍या मनपा शिक्षण विभागाच्‍या कामाकाजाबाबत आमदार महोदयांनी समाधान व्‍यक्‍त करुन आगामी काळात नाविण्‍यपुर्ण व दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्‍ध करण्‍यासाठी सर्वांनी सामुहीक सुसंवाद ठेवून योग्‍य नियोजन करण्‍याची सुचना केली.

शहराच्‍या अल्‍पसंख्‍याक बहुलभागात असणा-या मनपा शाळा विकास करण्‍यासाठी तसेच व मागास वस्‍त्‍यातील शाळांच्‍या विकास करण्‍यासाठी अल्‍पसंख्‍याक निधी व मागासवर्गीय विकास निधी मधून तरतुद व्‍हावी यासाठी सुध्‍दा पाठपुरावा केल्‍या जाईल.

या बैठकीला आमदार सौ.सुलभाताई खोडके यांच्‍या समवेत राष्‍ट्रवादी कॉग्रेसपार्टीचे प्रदेश उपाध्‍यक्ष प्रवक्‍ता तथा विधीमंडळ समन्‍वयक संजय खोडके, मनपा आयुक्‍तडॉ.प्रवीण आष्‍टीकर, अतिरिक्‍त आयुक्‍त हर्षल गायकवाड, उपायुक्‍त डॉ.सिमा नैताम, शहर अभियंता रविंद्र पवार, सिस्‍टीम मॅनेजर अमित डेंगरे, शिक्षणाधिकारी डॉ.अब्‍दुल राजीक, शाळा निरीक्षक गोपालकांबळे,मोहम्‍मद इम्रान, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ, समाज येथील समन्‍वयक धिरज सावरकर, समग्र शिक्षाचे सुरेंद्र बेलसरे, सचिन कारडे, दिपाली थोरात तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, माजी महापौर अॅड.किशोर शेळके, जितेंद्रसिंह ठाकूर, मनीष बजाज, गुड्डू धर्माळे, निलेश शर्मा, यश खोडके, प्रमोद महल्ले, योगेश सवई, प्रशांत पेठे, बंडू निंभोरकर, शक्ती तिडके, प्रा. डॉ. अजय बोंडे, बंडू धोटे, अमोल वानखडे, आनंद मिश्रा, किशोर भुयार, संजय मळनकर,कर्नलसिंग राहल,किशोर देशमुख, अनिल शुक्ला, संजय बोबडे, सुयोग तायडे, सचिन दळवी, शुभम पारोदे, मुख्तार अहेमद,संदीप आवारे,हबीब खान ठेकेदार,नदीम मुल्ला सर, अबरार साबीर, आदीसह मनपा अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *