अमरावतीच्या पोटे कॉलनी रोडवर असलेल्या नाश्त्याच्या अवैध गाडीमध्ये रात्री दरम्यान अचानक सिलेंडरचा स्पोट, उडाली धावपळ

अमरावतीच्या अति महत्वाच्या आणि पोस्ट कॉलनी पोटे पाटील कॉलनी रोड वरील डॉक्टर आशिष आणि इंद्रायणी वानखेडे यांच्या क्लिनिक समोर अवैध पद्धतीने चायनीज तथा विविध नास्था च्या गाड्या बिना परवाना चालत आहेत अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी याच्या तक्रारी केल्या पण महापालिका आणि पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले काल रात्री साडे आठच्या दरम्यान अचानक नाष्टा च्या गाडीवर सिलेंडरचा भडका उडाला आणि एकच धावपळ झाली या नाष्टा च्या गाडीच्या बाजूला डॉक्टरांच्या आणि परिसरातले लोकांच्या पार्किंग केलेल्या गाड्या होत्या त्यांनी आपला जीव धोक्यात घालून त्या गाड्या काढल्या म्हणून पुढील अनर्थ टळला काही वेळात अग्निशामक दलात आणि स्थानिक लोकांनी या सिलेंडर ला लागलेली आग विझवली जरी असली तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *