अंतर्गत सौंदर्यीकरणाने नवसारी स्मशानभूमीला आली नवी चकाकी, आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती २८ मे : महापालिका क्षेत्रातील नवसारी प्रभागातील स्मशान भूमीचे सौंदर्यीकरण करण्यात आले असून याठिकाणी आवश्यक सुविधा सुद्धा निर्माण करण्यात आल्या आहेत. या विकास कामांचे लोकार्पण आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार महोदयांनी विकास कामांच्या नामफलकाचे अनावरण करून लोकार्पणाची औपचारिकता साधली. यावेळी स्थानिकाच्या वतीने आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्यासह सर्व अतिथी मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नवसारी भागात रहिवाशी क्षेत्र वाढले असून लगतच्या परिसरात सुद्धा शहरीकरण होतांना दिसत आहे.

त्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी नवसारी स्मशानभूमी ही सोयीची व्हावी यासाठी याठिकाणी चांगल्या सुविधा निर्माण करण्यावर आपला भर राहणार असल्याचा विश्वास आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला माजी नगरसेवक प्रशांत डवरे व मंजुश्री महल्ले यांच्या प्रयत्नातून स्मशान भूमी परिसरात पेविंग ब्लॉक बसविणे व उद्यान परिसर विकसित कारण्यात आल्याबद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने त्यांच्याप्रति कृतज्ञता सुद्धा व्यक्त करण्यात आली.

यावेळी आमदार सौ सुलभाताई खोडकेसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ता, तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, बाळासाहेब महल्ले, वाघ साहेब , माजी नगर सेविका मंजुश्री महल्ले , प्रशांत महल्ले, छाया कथिलकर, संजीव कथिलकर, यश खोडके, मनपा उपअभियंता प्रमोद इंगोले, आशिष अवसरे, भारत गवई, संजय गायकवाड, दिनेश मेश्राम, सुभाष वसवे, सुधीर वसवे, संजय तायवाडे, विलास झाडे, विनोद दव्वलकर, बाबारावजी जाधव, राहुल बनसोड, त्र्यबंक सांगोले, जगतपाल पवार, आशिष पवार, प्रमोद महालले, योगेश सवई, संतोष त्रिपाठी, उत्तमराव याउल, शिवराय ढेंगळे, भूषण बनसोड, राजेश सांगोले, अजय लेंडे, पांडुरंग कडू, अण्णा तानोडे, समाधान गाडे, दत्तराज उम्बरकर, अशोक वासनकर, नितीन चोधरी, बाळासाहेब गुळसुंदरे, अण्णाजी बनसोड, प्रकाश तेलखडे, राजेश बर्वे, बंडू निभोरकर, प्रशांत पेठे, सुधीर मानकर, रामकृष्ण जांभुळकर, सोमेश रोहणकर, अक्षय भोंगारे, संदीप ठाकरे, सुयोग तायडे, आकाश वडनेरकर, राजाभाऊ टाके, गजानन पागृत, गोपाळ गुडदे, शुभम पारोदे, प्रज्वल घोम, सागर महल्ले, सुनील रोकडे, रोशन शेंडोळे, उत्तम भडके, रुपेश भडके, प्राद्यापक विजय काळे, विशाल भगत, पुंडलिक वाघमारे, छोटू खंडारे, संदिप जुनघरे, दत्तात्रय बागल, विलास देठे, राजेश कोरडे, भोजराज काळे, महेंद्र किल्लेकर, प्रताप देशमुख आदींसहित जेष्ठ नागरिक, युवक बांधव, आमंत्रित सदस्य व कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *