संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2022 परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच

विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती | संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संबंधित सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, शैक्षणिक सत्र 2021- 22 मधील उन्हाळी 2022 परीक्षेकरिता पात्र विद्यार्थ्यांच्या (वार्षिक व सत्र पद्धती) परीक्षा संचालनाची कार्यपद्धती विविध प्राधिकारणीनी दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने यापूर्वी 11 मे 2022 रोजी संलग्नित महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना कळविण्यात आली.

सदर निर्णय घेतांना प्राधिकरणाने विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या भावनांचा पुरेपूर विचार केला. आणि त्यानंतर उन्हाळी 2022 च्या परीक्षा ऑफलाईन डिस्क्रिप्टीव्ह पद्धतीनेच होतील असा निर्णय घेतला होता. सदर निर्णय यापूर्वी सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यार्थ्यांना विविध माध्यमांद्वारे कळविण्यात आला होता. तथापि विविध विद्यार्थी संघटनांनी उन्हाळी 2022 परीक्षा ऑफलाइन एम. सी. क्यू. पद्धतीने घेण्याबाबत निवेदन दिले होते. सदर निवेदने कुलगुरूंद्वारा गठित समितीच्या समोर सादर करण्यात आलीत. सदर समितीने केलेल्या शिफारशी 28 मे रोजी संपन्न झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीमध्ये ठेवण्यात आल्यात. सदर शिफारशींवर विद्या परिषदेने सखोल विचार विनिमय करून उन्हाळी 2022 च्या परीक्षा यापूर्वी निर्गमित केलेल्या परीक्षा संचालनाच्या निर्गमित पद्धतीनेच घ्याव्यात, असा एकमताने निर्णय घेतला आहे.

तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि अधिक माहिती करता आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा व जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा द्याव्यात असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *