समृद्धीच्या डोहाट बुडून युवकाचा मृत्यू, महामार्गाच्या कामात खोदलेली खड्ड्यांची झाली खादान, गाळ साचून डोहाट रूपांतर

धामणगाव रेल्वे : समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी केलेल्या खोदकाम करून तयार झालेल्या खदाणीत पोहायला गेलेल्या कामनापूर घुसळी येथील एका युवकाचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२ च्या सुमारास घडली आहे.नरेश वासुदेव रिठे वय ३९ असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीवरून तालुक्यातील कामनापुर घुसळी येथील शेतमजुरी करणारा नरेश वासुदेव रिठे वय ३९ हा दुपारी १२ च्या सुमारास उन्हाची तीव्रता वाढली असल्याने अंगोळीच्या तयारीत गणेशपुर शेतशिवरात गेला होता.दरम्यान सोमाजी ठवकर यांच्या शेतात गेला गेला असता समृध्दी महामार्गाच्या कामा दरम्यान गौण खनिज उतखन्नातून तयार झालेल्या खदाणीवर तो पोहचला.खदाणीत साचलेल्या या पाण्यात पोहायला त्याने पाण्यात उडी घेतली असता सदर डोहातील गाळ व खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्याला बाहेर पडता आले नाही व त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले.मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला.नाका-तोंडात पाणी जाऊन दम गुदमरुन नरेशचा मृत्यू झाला झाल्याचा प्राथमिक अंदाज तळेगाव दशासर पोलिसांनी व्यक्त केला असून ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस कर्मचारी दिलीप सावंत,प्रफुल वानखडे व अंकुश पाटील करीत आहेत. नरेश रिठे याच्या मागे आई वडील,दोन भाऊ,तीन विवाहित बहिणी व बराच मोठा आप्त परिवार आहे.

मागील वर्षात समृद्धीच्या डोहाट बुडून सात जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गाच्या कामात खोदकाम करून वापरण्यात आलेल्या मोठं मोठ्या खड्ड्यांचे रूपांतर आता खदाणीत व डोहाट झाले आहेत.अश्याच प्रकारातून फेब्रुवारी २०२१ दरम्यान तालुक्यातील वाठोडा (बु) येथील दोन विद्यार्थ्यांचा गावानजीकच्या जलयुक्त शिवाराच्या नाल्यातर बुडाल्याने मृत्यु झाला होता. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच एकाच वेळी निंभोरा राज येथील तीन विद्यार्थ्यांचा व एका महिलेचा समृद्धी महामार्गाच्या खोलीकरण केलेल्या चंद्रभागा नदीत बुडाल्याने मृत्यु झाला होता.त्याच प्रमाणे ८ फेब्रुवारीला समृद्धी महामार्गाच्या कामावर असलेल्या एका मजुराचा सुद्धा मृत्यू या डोहाट पडून झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.त्यामुळे आता हा धृतगति मार्ग तयार करण्यासाठी तब्बल १७ गावांच्या हद्दीत गौण खनिजासाठी केलेल्या अमर्याद खोलिकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पाणीमय खड्डे ठरतेय मृत्यूचा सापडा

शासनाने आखलेल्या चौकटीत बसून गौण खनिज केले जावे असा गी आर शासनाचा असताना  कंत्राटदारांनी दिवस रात्र नियमांची पायमल्ली करीत नियमापेक्षा जास्त उत्तख्खन या परिसरात केले आहे.उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा या खड्यांमध्ये पाणी साचले असल्याने त्याची खोली मोजमाप करता येन शक्य नाही आहे.तर पावसाळ्यात भयावह स्थिती होईल असे असताना प्रशासनाची शून्य कारवाई आहे. परिणामी या खड्याना कुठलीही सुरक्षा नसल्याने या ठिकाणी जीवित हानी झाल्यास जबाबदारी कुणाची हा प्रश्न शेतकऱ्यांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *