दानशुर, कर्तुत्वान, कार्यक्षम राज्यकर्ती आणि लोक कल्याणकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजही मार्गदर्शक – आ. सौ. सुलभाताई खोडके

  • राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 297 वी जयंती दिनी आ. सौ. सुलभा खोडके द्वारे विनम्र अभिवादन
  • लोककल्याणकारी राणी, कर्मयोगिनी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा वसा जोपासण्याचा उपस्थितांचा विर्धार

अमरावती दि. 31 मे लोककल्याणकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्याच्या विकासाकरीता पुर्वीच्या कायद्यामध्ये परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेनुसार शेतक-यांची जाचक कराच्या अटीतुन मुक्तता करुन त्यांना गोपालनाचे महत्व त्यांनी पटवुन दिले. आपल्या शासन काळात गरजुंकरीता अन्न छत्र, जागोजागी पाणपोया तसेच राज्यत आणि राज्याबाहेर पर्यावरण व जलसंधारणाच्या क्षेत्रात त्यांनी सुधारणा घडवुन आणल्या. वणिकरण व जलस्त्रोतांवर त्यांनी त्याकाळी प्रभावी उपाययोजना करीत सर्वांना वृक्ष संवर्धनाचे व जससंचयाचे महत्व पटवुन दिले. संपुर्ण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणच्या मंदीराचा जिर्णोध्दार करीत त्यांनी धर्मशाळा बांधणे, घाट बांधणे, आदि सहित अन्य कामांना प्राधान्य दिले. आजच्या काळात जो सात – बारा चा जो उल्लेख केला जातो. त्या सात – बाराची सर्वप्रथम पसंकल्पना राबवित अहिल्यादेवींनी या कार्याला सुरुवात केली. तात्कालीन काळात शेतक-यांना आपल्या बांधावर झाडे लावणे सक्तीचे करण्यासह त्या झाडांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी सोपवित त्यांनी शेतक-यांना पर्यावरण रक्षणाचे महत्व पटवुन दिले. उत्कृष्ट प्रशासक, नैतिकतेचा आदर्श, न्यायप्रिय, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष महाराणी, पुरोगामी, स्त्री उध्दारक, कृती, वचन, व शासन यांचा आदर्श असलेली सुधारक अशी त्यांची ख्याती होती. दानशुर कर्तुत्वान, कार्यक्षम राज्यकर्ती आणि लोक कल्याणकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी मंगळवार दि. 31 मे रोजी यशोमंगल लेआऊट – व्ही.एम.व्ही रोड स्थित म्हस्के सेलिब्रेशन हाॅल येेथे राजमाता पुण्यश्कोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 वी जयंती उत्सव कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांना संबोधुन केले.

सर्वप्रथम पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर चौक येथे आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत डवरे, अहिल्या महिला परिषदेच्या अध्यक्षा शारदा ढवळे, वंदनाताई एडतकर आदि मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी अहिल्या महिला परिषदेच्या माजी अध्यक्षा साधनाताई म्हस्के व सहकारी महिला भगिनिंच्या वतीने आ. सुलभाताई खोडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविका दरम्यान योग प्रशिक्षक राजु डांगे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जिवन कार्यावर प्रकाशझोत टाकला. दमयंती उमेकर, पदमा फुटाणे, नंदा चाफले यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता केलीू. कार्यक्रमाचे संचालन – जयश्री शहाकार, यांनी तर आभार प्रदर्शन योगिता गोहत्रे यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, अहिल्या महिला परिषदेच्या अध्यक्षा – शारदा ढवळे, वंदनाताई एडतकर, साधना म्हस्के, शोभा काळमेघ, वंदना डांगे, पद्मा फुटाणे, कल्पना ढोके, अर्चना गावनेर, संगिता साव, सुषमा भागवत, वनमाला फुटाणे, प्रियंका खैरकर, संगिता काळे, छाया कथिलकर, सरला ढवळे, निलम मातकर, प्रणिता कोल्हे, सुषमा डाखोरे, प्रेमा लव्हाळे, वंदना गायनर, जयश्री शहाकार, प्रतिभा उमेकर, सुजाता नवले, दमयंंती उमेकर, संध्या गंधे, सरोज अौघड, योगिता गोहत्रे, वैष्णवी गादे, अश्विनी अवघड, नंदा चापले, हरीदीनी लव्हाळे, सुनिता पाटील, सविता तालन, शितल ढवळे, उज्वला कापडे, रेखा गावंडे, सुनिता गावंडे, राजेंद्र म्हस्के, डाॅ. सुधाकरराव काळमेघ, राजु डांगे, अनुज म्हस्के, काशिनाथ फुटाणे, विजय पाटेकर, दत्तात्रय फुटाणे, सचिन शहाकार, शंकर ढवळे, सुधाकर गादे, निरज मातकर, गजानन गावनेर, रामभाऊ मुनाने, सुरेश ढवळे, शेखर औगड, विठ्ठराव घुरडे, अशोकराव लव्हाळे, राजेंद्र म्हस्के, दिलीप घुरडे, मयुर चापले, योेगेश काळमेघ, रविंद्र तालन, छोटु खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *