अमरावती मध्यवर्ती कारागृहातून तीन कैदी फरार, सोमवारी रात्री दोन ते तीन वाजता ची घटना

तीनही आरोपी वीस ते बावीस वर्षे वयोगटातील

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी उशिरा रात्री दोन ते तीन वाजताच्या दरम्यान वीस ते बावीस वर्षे वयोगटातील आरोपींनी कारागृहातील मुक्त गेटच्या बाजुला असलेल्या भिंतीवर ब्लॅंकेट व केबल च्या माध्यमाने कारागृहातून पळाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कारागृह प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीस या तीनही आरोपींचा शोध घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तीनही आरोपी 20 ते 22 वयोगटातील असून यातील एक आरोपी हा खुनाच्या गुन्ह्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता, अशातच या तीनही आरोपींनी कारागृहातून पळ काढल्याने कारागृह प्रशासनामध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेनंतर कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

कारागृहातून पळ काढलेल्या आरोपींची माहिती पुढील प्रमाणे आहे

(1) रोशन गंगाराम उईके
(2) सुमित धूर्वे
(3) साहिल अजमल काळसेकर

न्यायाधिन कैदी न 519 – रोशन गंगाराम उईकें वय 22 वर्ष रा मू.पो. बाला पेठ शे घाट तहसील वरूड तहसील वरूड जिल्हा अमरावती, अप न 61/2021 पो स्टे शे घाट कलम 363, 376 lpc
1/8/2021पासून जेल मध्ये आहे.

कैदी न 607 सुमित शिवराम धुर्वे रा मु.पो. बलापेथ शेघाट तहसील वरूड जिल्हा अमरावती
अप क्र 61/2021 पो स्टे शेंदुर्धनाघाट, कलम 363,376 भादवी, 1/8/2021 पासून जेल मध्ये आहे.

कैदी न C 6065 – साहिल अजमल कलसेकर वय 33 वर्ष, रा. नायासी तहसील चिपळूण जिल्हा रत्नागिरी, अप न 81/2015, S C न 28/2015, 23/03/2022 पासून नागपूर कारागृह येथून शिक्षा भोगण्या करिता अमरावती कारागृह येथे होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *