उच्च शिक्षण विभागाचे सहायक संचालक एसीबीच्या जाळयात, डॉ. मुरलीधर वाडेकर यांनीं केली ३० हजारच्या लाचेची मागणी

सहायक प्राध्यापकाचा वेतन निश्चिती साठी मागितली लाच

पोलीस, महसूल, आणि बांधकाम विभागात भ्रष्टचारात समोर असून या विभागांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नेहंनीच कारवाईचा फास आवळला असल्याचे समोर आले आहे. मात्र आता उच्च शिक्षण विभागात भ्रष्ट प्रवृत्ती मुरत असून यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा फास आवळला असून चक्क अमरावती विभागाचे सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग हे एसीबी च्या जाळयात अडकल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. “सहायोगी प्राध्यापक” या पदासाठीचा प्रस्ताव मंजूर करणे, त्या पदावरील वेतन निश्चिती करून, सर्विस बुकवर नोंद करण्यासाठी ३० हजार रुपयाच्या लाचेची मागणी केल्या प्रकरणी अमरावती विभागाचे सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग डॉ. मुरलीधर प्रभाकर वाडेकर यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हाथ अटक केली. यासंदर्भात दि.२९/०६/२०२२ रोजी एसीबी विभागाला तक्रार प्राप्त झाली. सदर तक्रारीवरून करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान तक्रारदार यांना सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, अमरावती विभाग, अमरावती येथील सहसंचालक मुरलीधर वाडेकर यांनी 30,000/- रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केल्याचे तसेच निष्पन्न झाले. त्यानंतर दिनांक 30/ 06/2022 रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान आलोसे यांनी तक्रार यांच्याकडून 30,000/-रु. लाच रक्कम स्वीकारली. आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, आरोपीविरुद्ध पो.स्टे. गाडगेनगर अमरावती शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.चे पोलीस अधिक्षक, विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री.अरुण सावंत, अप्पर पोलिस अधीक्षक, देविदास घेवारे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक, तथा तपास अधिकारी – सतिश उमरे, देविदास घेवारे, अपर पोलीस अधीक्षक, सतिश उमरे, पोलीस निरीक्षक, पोना/ युवराज राठोड, पोशी/ शैलेश कडू, यांच्या पथकाने हि कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *