मणीबाई गुजराती हायस्कूल मध्ये अनोख्या पद्धतीने प्रवेशोत्सव साजरा

आज दिनांक 29 जून 2022 रोजी दी गुजराती एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित मणिबाई गुजराती हायस्कूल मध्ये वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी प्रवेशोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी सेल्फी पॉइंट मध्ये सेल्फी काढतांना मनमुराद आनंद लुटला. यावेळी पालकांनी देखील आपल्या चिमुकल्यांची आनंददायी क्षणचित्रे टिपली. विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दी गुजराती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.दिलीपभाई पोपट व सहसचिव मा. हर्षदभाई उपाध्याय यांची सुद्धा उपस्थिती होती.

सजवलेल्या प्रवेशद्वारामधून, स्कूल चले हम गाण्याच्या साथीने विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला. दी गुजराती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय दिलीप भाई पोपट व सहसचिव माननीय श्री हर्षद भाई उपाध्याय यांनी विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवामध्ये मनःपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील शैक्षणिक वर्षाकरिता समस्त कार्यकारणी व पदाधिकारी तर्फे शुभेच्छा दिल्या त्यावेळी मुख्याध्यापिका सौ. अंजली देव मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. पंजाबी सर, पर्यवेक्षिका सौ. गायकवाड मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. संगीता उपासे मॅडम, सौ. भोंगाळे मॅडम यांच्यासमवेत सर्व शिक्षकांनी नवागतांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय अभ्यासक्रम पुस्तकांचे वाटप व पोषक खाऊ (शेंगदाणा चिक्की, राजगिरा लाडू) आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेचा ‘Virtual Tour’ देखील केला. यावेळी कृतियुक्त गीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नृत्याचा आनंद घेतला व शालेय पोषण आहार घेऊन विद्यार्थी हसत मुखाने घरी परतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *