साडेचार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न

राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 26 वर्षीय आईने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, तिच्या चुलत भावाने साडेचार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. पीडित मुलीच्या आईने राजापेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, तिच्या साडेचार वर्षांच्या मुलीला तिचा चुलत भाऊ घरात नसताना चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिच्या घरी नेले. तेथे त्याने मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीने सर्व हकीकत आईला सांगितली. यावर महिलेने आपल्या मुलीसह राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन पीडित मुलीच्या चुलत भावाविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी कलम 376, 506, कलम 4, 6, पोस्को अन्वये गुन्हा नोंदवून कारवाई सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *