चोरीचे मोबाईल विकले OLX वर दोन मोबाईल चोरट्याना पोलिसांनी केली अटक

फ्रेजलपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अमरावती चांदुर रेल्वे मार्गावरील फन अँड वॉटर पार्क येथे 3जुलै ला फिर्यादी दानिश खान अनिस खान 19वर्ष रा.चांदणी चौक येथील राहणार असून तो त्याच्या सहा मित्रा समवेत फन अँड वॉटर पार्क मध्ये स्विमिंग करण्याकरिता गेले होते. त्यावेळी त्यांनी आपले 7 मोबाईल फोन आणि 7 हजार रुपये रोकड,व इतर साहित्य आपल्या जवळील कॉलेज बॅग मध्ये ठेवून ते सर्व मित्र स्विमिंग करण्यास गेले.त्यांच्या नकळत अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. ज्याची किंमत अंदाजे 7 मोबाईल 37 हजार रुपये व 7 हजार रुपये असा एकूण 44 हजार रुपयांचा मुद्देमाल गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून फ्रेजलपुरा पोलिस टीम पोलीस उप निरीक्षक गजानन राजमलू ,पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश श्रीवास, व टीम यांनी तांत्रिक रीत्या गुन्ह्याचा तपास करत सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली. आरोपी आरिफ खान आबिद खान वय 18, रा. फातिमा नगर, लालखडी, तर दुसरा आरोपी सोहेल यासिन कामदार 18 वर्ष रा. सुफीयान नगर नं. 1, वलंगाव रोड याना या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक करून त्यांचे कडून त्यांनी चोरलेल्या 7 मोबाईल पैकी 3 मोबाईल व 15 हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला असून गुन्ह्यातील उर्वरित 4 मोबाईल फोन आरोपीनी OLX या साईटवर जाहिरात देऊन विक्री केल्याचे आरोपीनी पोलिसांना सांगितले. या कारवाईत फ्रेजलपुरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार अनिल कुरळकर यांच्या नेतृत्वाखाली पो.नि.गुन्हे नितीन मगर, पो उप नि.गजानन राजमलू, पो.हे.कॉ. योगेश श्रीवास, ना.पो.कॉ. हरीश बुंदेले, श्रीकांत खडसे, पो.कॉ.धनराज ठाकूर, अनुप झगडे यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *