अल्पवयीन युवती चा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस ३ तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

अल्पवयीन युवती चा विनयभंग केल्या प्रकरणी शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी यशवंत गंगाराम तायडे वय ६५ राहणार तपोवन यास ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रू . २,००० / – दंड ची शिक्षा सुनावली आहे घटनेची हकीकत नमुद गुन्हयाची थोडक्यात हकिकत अशी की , अल्पवयीन पिडीत हि दिनांक १ ९ .१०.२०१६ रोजी सायंकाळी ०७.०० वाजता चे सुमारास तिच्या टयुशन वरून घरी परतत असतांना आरोपीने पिडीतेस तिला पेढा देण्याचे आमीष दाखवून त्याचे वारी बोलाविले व तिचे आक्षेपार्ह पध्दतीने स्पर्श करून विनयभंग केला व तसा रिपोर्ट सदर आरोपी विरूध्द पोलिस स्टेशन गाडगेनगर , अमरावती येथे दाखल केला . सदर प्रकरणात तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले . सदरच्या प्रकरणा मध्ये आरोपीचे विरूध्द गुन्हा शाबीत करण्या करीता सरकारचे वतीने अति . सरकारी वकील अॅड . पी . आर . इंगळे यांनी एकूण ८ साक्षीदार तपासले . सदरचे प्रकरणामध्ये पुराव्याचे अवलोकन करून व सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राहय धरून वि . न्यायालयाने आरोपी याला ८ , १२ पोक्सो अॅक्ट अंतर्गत दोषी धरले . ८ . शिक्षा –वि . न्यायालयाने आरोपीला कलम ८ पोक्सो अॅक्ट अतंर्गत तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रू . ३,००० / – दंड व दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली . आणि कलम १२ पोक्सो अॅक्ट अतंर्गत ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रू . २,००० / – दंड व दंड न भरल्यास दोन महिने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *